1. आरोग्य सल्ला

रोज मुठभर फुटाणे आणि गूळ खा ! चला तर मग जाणून घेऊ याचे फायदे

गुळाचे सेवन आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. गुळामध्ये 'आयरन' मुबलक प्रमाणात असते . गुळाचे सेवन केल्याने रक्त शुद्ध होते.तसेच हे शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढवते.

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
रोज मुठभर फुटाणे आणि गूळ खा ! चला तर मग जाणून घेऊ याचे फायदे

रोज मुठभर फुटाणे आणि गूळ खा ! चला तर मग जाणून घेऊ याचे फायदे

एवढेच नाही तर गुळामध्ये सोडियम, व्हिटॅमिन्स, पोटॅशियम आणि कार्बोहायड्रेट्स मोठ्या प्रमाणात आढळतात.त्यामुळे गूळ आणि फुटाणे खाणे आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे. याचे सेवन केल्याने शरीरातील घाण साफ होते.मधुमेहाच्या समस्या, तसेच पोटाशी संबंधित समस्या इ. दूर करण्यासाठी हे खूप उपयुक्त आहे. फुटाण्यामध्ये कार्बोहायड्रेट,प्रोटिन्स, आयरन, कॅल्शियम आणि अनेक प्रकारची विटामिन आढळतात. त्याच्या नियमित सेवनाने रोग प्रतिकारशक्ती देखील वाढते, जे आपले शरीरास अनेक रोगांपासून वाचवते. फुटण्याचे सेवन केल्याने मन तीक्ष्ण होते. पण जर फुटाणे आणि गूळ खाल्ल्यास त्याची ताकद अनेक पटींनी वाढते. ज्यामुळे ते आपल्यासाठी आणखी फायदेशीर ठरते.

चला तर जाणून घेऊया फुटाणे आणि गूळ खाण्याचे फायदे:- 1. चेहऱ्यावर चमक येते :-गूळ आणि हरभरा त्वचा सुधारते कारण त्यात झिंक मुबलक प्रमाणात असते . पुरुषांनी रोज याचे सेवन केले पाहिजे, ज्यामुळे चेहऱ्याची चमक वाढण्यास मदत होते आणि ते पूर्वीपेक्षा अधिक सुंदर दिसूही लागते .2. हे स्नायूंसाठी फायदेशीरआहे :-गूळ आणि हरभऱ्यामध्ये प्रोटिन्स मुबलक प्रमाणात असतात , ज्यामुळे स्नायू मजबूत होण्यास मदत होते. स्नायू(मसल्स) बनवणाऱ्या लोकांसाठी दररोज गूळ आणि हरभरा खाणे फायदेशीर आहे.3.लठ्ठपणा कमी करते :-गूळ आणि हरभरा एकत्र खाल्ल्याने शरीरातील मेटाबॉलिज्मचे प्रमाण वाढते, ज्यामुळे लठ्ठपणा कमी होण्यास मदत होते. लठ्ठपणा कमी करण्यासाठी, बरेच लोक जिममध्ये जातात, व्यायाम करतात, तसेच त्या लोकांना गूळ आणि हरभरा खाणे आवश्यक आहे.

4. बद्धकोष्ठता दूर करते :-कमकुवत पचनशक्तीमुळे, बद्धकोष्ठता आणि एसिडिटीची समस्या असते, अशा परिस्थितीत हरभरा आणि गूळ खाणे फायदेशीर असते कारण त्यात फायबर भरपूर प्रमाणात असते जे पचनशक्ती व्यवस्थित ठेवते.5 मन तीक्ष्ण करते :-गूळ आणि हरभरा एकत्र खाल्ल्याने मेंदू तीक्ष्ण होण्यास मदत होते ,कारण त्यात व्हिटॅमिन-बी मुबलक प्रमाणात असते जे स्मरणशक्तीला पॉसिटीव्ह चालना देते.6. दात मजबूत करते :-गूळ आणि हरभऱ्यामध्ये मुबलक प्रमाणात फॉस्फरस असते , जे दातांसाठी खूप फायदेशीर आहे

गूळ आणि हरभरा एकत्र खाल्ल्याने दात मजबूत होतात आणि दातांशी संबंधित समस्या दूर राहतात.7. हृदयासाठी फायदेशीर :-ज्या लोकांना हृदयाशी संबंधित कोणतीही समस्या आहे. गूळ आणि हरभरा यांचे सेवन त्यांच्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्यात पोटॅशियम असते जे हृदयविकाराचा धोका येण्यास टाळते.8.हाडांसाठी फायदेशीर :-संधिवात आणि शरीरातील थकवा यासारख्या समस्यांवर दररोज गूळ आणि हरभरा खाणे खूप फायदेशीर आहे. कारण त्यात व्हिटॅमिन आणि कार्बोहायड्रेट्स मुबलक प्रमाणात असतात. जे थकवा दूर करण्यासाठी खूप फायदेशीर आहे.

English Summary: Eat a handful of crackers and jaggery every day! So let's learn the benefits Published on: 17 May 2022, 04:59 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters