1. आरोग्य सल्ला

Corona Update: कोरोनाचा धोका वाढतोय? गेल्या 24 तासात देशात 6,065 रुग्णांची नोंद, महाराष्ट्रात यापैकी निम्मे रुग्ण

कोरोना काही पिच्छा सोडताना दिसत नाहीये. शनिवारी रात्री अकरा वाजेपर्यंत देशात कोरोनाचे 6065 नवीन रुग्णांची नोंद झाली असून देशांमध्ये पुन्हा एकदा कोरोनाने जोर पकडला आहे की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
corona patient increase in country and large number in maharashtra at saturday

corona patient increase in country and large number in maharashtra at saturday

कोरोना काही पिच्छा सोडताना दिसत नाहीये. शनिवारी रात्री अकरा वाजेपर्यंत देशात कोरोनाचे 6065 नवीन रुग्णांची नोंद झाली असून देशांमध्ये पुन्हा एकदा कोरोनाने जोर पकडला आहे की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

यामध्ये धोकादायक गोष्ट म्हणजे आत्ता महाराष्ट्रात यापैकी 2922 रुग्णांची नोंद केली गेली आहे. महाराष्ट्रानंतर दिल्लीचा क्रमांक असून संपूर्ण देशात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 41 हजार 800 च्या पुढे आहे.

शनिवारी संपूर्ण देशामध्ये 3 लाख 44 हजार चाचण्या घेण्यात आले असून कोरोनाचा डेली पॉझिटिव्हिटी रेट 2.41 टक्के आणि साप्ताहिक पॉझिटिव्हिटी रेट 1.75 टक्के नोंदवला गेला आहे.

 महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आणि महाराष्ट्राचा पॉझिटिव्हिटी रेट 7.07 टक्के

 देशात सर्वाधिक 2922 कोरोना बाधित महाराष्‍ट्रात आढळले असून एकमेव  मृत्यूदेखील महाराष्ट्र मध्ये झाला आहे. महाराष्ट्र मध्ये सक्रिय रुग्णांची संख्या म्हणजे रुग्ण उपचार घेत आहेत अशा रुग्णांची संख्या 14 हजार 458 असून यामध्ये शनिवारी 3081 नवीन रुग्णांची भर पडली. एकूण रुग्ण संख्यामध्ये  कर्नाटक तिसऱ्या क्रमांकावर असून शनिवारी कर्नाटक मध्ये कोरोना चे 562 नवे रुग्ण आढळले.

नक्की वाचा:कोविड सेंटर सुरू करण्याचे आदेश, पुण्यात कोरोना रुग्णसंख्या वाढली..

 येथे सक्रिय रुग्णांची संख्या 40 हजार एकशे आठ असून शुक्रवारी 535 नवीन प्रकरणे आढळून आली होती. त्याचवेळी गुरुवारी 471 नवीन रुग्ण आढळले.

शेवटच्या दिवशी एका व्यक्तीचा कोरोना मृत्यू झालेला नाही. राजधानी दिल्लीत देखील गेल्या 24 तासात 795 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली असून 556 रुग्ण यातुन बरे झाले आहेत.  दिल्लीमध्ये कोरोनाचे सक्रिय रुग्णांची संख्या 2247 असून मृत्युदर 4.11 टक्के नोंदवला गेला आहे.

भारतातील लसीकरणाची स्थिती

आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, संपूर्ण देशात कोविड लसीकरणात मोहिमेच्या माध्यमातून आठवड्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत म्हणजेच शनिवारपर्यंत लसींची 195 कोटी डोस देण्यात आले आहेत.

नक्की वाचा:बेसावधपणा येणार अंगलट; देशात सापडले दोन महिन्यातील सर्वाधिक रुग्ण

नक्की वाचा:चिंता वाढली! कोरोना रुग्ण संख्येत मोठी वाढ; जाणून घ्या आजची आकडेवारी

English Summary: corona patient increase in country and large number in maharashtra at saturday Published on: 12 June 2022, 10:07 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters