1. आरोग्य सल्ला

हिरवा लसूण खाण्याचे जबरदस्त आयुर्वेदिक फायदे, वाचून बसणार नाही विश्वास

आपल्या दैनंदिन आहारात बऱ्याच मसाल्याच्या पदार्थाचा उपयोग होतो त्यामधील एक म्हणजे लसूण. दैनंदिन जीवनात लसणाचा वापर जेवण बनवण्यासाठी तसेच मसाल्याचा पदार्थ म्हणून मोठ्या प्रमाणात केला जातो. त्याच्या मागे अनेक फायदेशीर कारणे सुद्धा आहेत. लसूण खाणे आपल्या शरीरासाठी आणि आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे.

किरण भेकणे
किरण भेकणे
garlic

garlic

आपल्या दैनंदिन आहारात बऱ्याच मसाल्याच्या पदार्थाचा उपयोग होतो त्यामधील एक म्हणजे लसूण. दैनंदिन जीवनात लसणाचा वापर जेवण बनवण्यासाठी तसेच मसाल्याचा पदार्थ म्हणून मोठ्या प्रमाणात केला जातो. त्याच्या मागे अनेक फायदेशीर कारणे सुद्धा आहेत. लसूण खाणे आपल्या शरीरासाठी आणि आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे.

हिरवा लसूण खाण्याचे फायदे:-

हिरव्या लसणात अनेक आयुर्वेदिक गुणधर्म आढळतात लसणामध्ये अॅलिसिन या नावाचे अँटीऑक्सिडंट मोठ्या प्रमाणात आढळतात. याचा उपयोग शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी केला जातो. तसेच शरिरातील जळजळ कमी करण्यासाठी सुद्धा हिरव्या लसणाचे सेवन केले जाते. तसेच  व्हायरल इन्फेकॅशन पासून सुद्धा आपला  बचाव  होतो. तसेच लसणाचे  सेवन केल्यामुळे पोटसंबंधीत असलेले आजार नाहीसे होतात तसेच पचनक्रिया सुरळीत पणे चालते. लसूण खाल्ल्यामुळे दमा तसेच उच्च रक्तदाब यासारखे आजार  नाहीसे  होण्यास  मदत होते.

विविध आजारांवर गुणकारी:-

हिरव्या लसणाचा वापर शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणात केला जातो. लसनामध्ये असलेलं अॅलिसिन कॅन्सरसारख्या गंभीर आजारांपासून आपले बचाव करण्यासही मदत करते. यामुळे कॅन्सर पिढीत रूग्णांना हिरव्या लसणाचे सेवन करणे गरजेचे तसेच फायदेशीर आहे.नियमित लसणाचे सेवन केल्यामुळे हृदय विकाराचा धोका कमी होतो तसेच मधुमेह यापासून सुटका होते. तसेच रक्तातील हिमग्लोबिन वाढते आणि रक्त शुद्ध होण्यास मदत होते. गरोदरपणात महिलांनी लसणाचे सेवन केल्याने उच्च रक्तदाब नियंत्रणात राहतो.

दैनंदिन जीवनात वापर:-

दैनंदिन जीवनात वापरला जाणाऱ्या हिरव्या लसणाला स्प्रिंग लसूण असे सुद्धा म्हटले जाते. हिरव्या लसणाची चव ही सौम्य आणि कमी तिखट आहे. लसणाच्या कळ्या तयार होण्यापूर्वी च हिरवा लसूण जमिनीतून ककाढून वापरला जातो. आहारात हिरव्या लसणाचा वापर हा सूप, चीझी डिप्स, स्टिर-फ्राईज किंवा सॅलड्स, चिकन आणि फिश फ्राय करताना केला जातो. पदार्थांची चव वाढवण्यासाठी हिरवा लसूण वापरला जातो.

English Summary: Considering the tremendous Ayurvedic benefits of eating green garlic, believe me Published on: 14 December 2021, 04:11 IST

Like this article?

Hey! I am किरण भेकणे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters