1. आरोग्य सल्ला

सांधेदूखी, मणक्यांचे आजार, दुखावलेले स्नायू काळजी व उपचार

साधारण वयाची पन्नाशी उलटली कि मग हळूहळू गात्रे शिथिल पडायला सुरवात होते.

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
सांधेदूखी, मणक्यांचे आजार, दुखावलेले स्नायू काळजी व उपचार

सांधेदूखी, मणक्यांचे आजार, दुखावलेले स्नायू काळजी व उपचार

साधारण वयाची पन्नाशी उलटली कि मग हळूहळू गात्रे शिथिल पडायला सुरवात होते. चष्म्याचा नंबर वाढत जातो, कानाने कमी ऐकायला येणे, अंगात ताकद कमि पडणे .सांधेदुखी, कंबरदूखी, गुडघेदुखी, खांदे झिजणे,सायटिका असे नाना आजार वर्णी लावतात.मग वेगवेगळे वैद्य, डॉक्टर सगळ्याच क्षेत्रातले त्यांच्या चिकित्सा घेणे चालू होते. पण आपण हे टाळू शकतो. थोडी आधीपासूनच काळजी घेतली तर मग कुठेच जाण्याची गरज भासत नाही. सहसा सांध्यामध्ये लुब्रिकंट, वंगण कमि

झाल्याने दोन मणके एकमेकांवर घासल्याने मणक्याची झीज होते.Vertebral degeneration occurs when two vertebrae rub against each other. व त्या ठिकाणी गँप तयार होते. किंवा मणक्यातील गादी घासल्या जाते. त्यामुळे मुंग्या येणे,पायाच्या मागील बाजूने कंबरेपर्यंत शीर दुखणे,मांडी घालता न येणे, सकाळी उठतांना त्रास होणे,इंडियन टाँयलेटमध्ये बसता न येणे असे त्रास होतात.मग आपण आहार विहारच बदलावा.जवस एक चमचा, तिळ एक चमचा, आवळा पावडर एक चमचा असे एकत्रित पूड बनवून सकाळीच पाण्यासोबत घ्या. किंवा मेथिची कच्ची पूड पाण्यासोबत घ्या.

अश्वगंधा पावडर दूधात घालून व थोडे तूपही टाकुन घ्यावे. याने स्नायूंना बल मिळते.रोज उपाशीपोटी सकाळी अळिव १ चमचा रात्रि भिजत घालून त्यात १ चमचा तूप , एक दोन चमचे गूळ व ड्रायफ्रूट, वेलची पावडर टाकून खिर करून खा. तुमची सांधेदुखि बरी होते.रोज जेवतांना गव्हाएवढा चूना वरणभातात कालवून घ्या. कँल्शिअमची कमतरता भासणार नाही.दिवसातून दोनदा बाभळिच्या शेंगाचे चूर्ण मधात मिसळून घ्यावे.

रोज व्यवस्थित एक विशिष्ट वेळात शौच येत असेल तर शरीर शुद्धि झाल्याने वातविकार होत नाही. त्याकरता रात्री त्रिफळा चूर्ण पाण्यासोबत घ्यावे. सकाळी कोठा साफ होतो.जेवणात गाईचे साजूक तूप निदान चमचाभर रोज घ्यावे. जवस, तिळ, लसूण, खोबरे याची सुकी चटणी कायम ठेवावी.  शक्यतोवर हातसडिचा तांदूळ वापरावा. उडिद डाळ हि बल देणारी असल्याने वरण, आमटि, किंवा कणकेत मिसळून खावी. हिंग, ओवा, दालचिनि, धने, जिरे, मिरे लवंग हे गरम मसाले थोड्या प्रमाणात रोजच्या जेवणात वापरावे.

जेवतांना पहिला घास भाताचा घेतांना हिंगाष्टक चूर्ण व तूप मिसळावे. आणि जेवण संपताना अदमोरे ताक घ्यावे.लसूण तिळतेलात शिजवून हे सिद्व तेल करून याने अधून मधून सांध्याची मालीश करा. किंवा जायफळ पूड तिळ तेलात शिजवून ह्या तेलाने मालिश करा.निर्गुंडिचा पाला तेलात काळा होईपर्यंत शिजवून या तेलाने मसाज करा.भाज्यामध्ये उपकारक भाज्या म्हणजे कोहळे, दूधिभोपळा, कारले, पडवळ, घोसाळे, कटुर्ले, भेंडि यांचा नियमित आहारात वापर करावा.

विशेषतः शेवग्याला वरचे स्थान आहे. आठवड्यातून दोनदा याचि भाजि, आमटि, सार, सूप करून खावे. याने गुडघे दुखणे व सांधे दुखणे बंद होते. आंबट फळे सोडून बाकिची खाता येईल.सांधेदुखिवर रामबाण औषध आणि वाताचा मित्र म्हणून गुगुळला फार महत्वाचे स्थान आयुर्वेदात दिल्या गेले आहे. सिंहनाद गुगुळ, वातविद्धवंसक वटि,मेदोहर गुगुळ कैशोर गुगुळ, योगराज गुगूळ अशी विविध नावाने प्रसिद्ध असलेले हे गुगुळयुक्त मेडिसिन सांधेदुखीपासून मुक्तता देते.

English Summary: Arthritis, Spine Diseases, Painful Muscles Care and Treatment Published on: 28 August 2022, 07:02 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters