1. सरकारी योजना

सरकार शेतकऱ्यांना देतंय वार्षिक 36 हजार रुपये पेन्शन; तुम्ही सुद्धा 'या' योजनेचे होऊ शकता लाभार्थी

शेतकऱ्यांसाठी केंद्र व राज्य सरकार (Central and State Govt) नवनवीन योजना राबवत असते. ज्यातून शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळतो. यामधीलच एका योजनेविषयी आज आपण माहिती घेणार आहोत.

रूपाली उत्तम कदम
रूपाली उत्तम कदम
government annual pension

government annual pension

शेतकऱ्यांसाठी केंद्र व राज्य सरकार (Central and State Govt) नवनवीन योजना राबवत असते. ज्यातून शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळतो. यामधीलच एका योजनेविषयी आज आपण माहिती घेणार आहोत.

शेतकऱ्यांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी सरकार प्रधानमंत्री किसान मानधन योजना (Pradhan Mantri Kisan Mandhan Yojana) राबवत आहे. भारत सरकारच्या या योजनेत फक्त १८ ते ४० वयोगटातील शेतकरीच अर्ज करू शकतात.

जनावरांमधील कासदाह आजारामुळे दूध उत्पादनात होतेय घट; करा घरीच 'या' उपाययोजना

जेव्हा तुम्ही 60 वर्षांचे व्हाल. त्यानंतर तुम्हाला दरमहा ३ हजार रुपये पेन्शनचा (Pension) लाभ मिळेल. म्हणजेच तुम्हाला वार्षिक 36 हजार रुपये पेन्शनचा लाभ घेता येईल.समजा तुम्ही वयाच्या ४० व्या वर्षी या योजनेत अर्ज केल्यास तुम्हाला प्रधानमंत्री किसान मानधन योजनेत दरमहा २०० फक्त रुपये गुंतवावे लागतील.

या योजनेंतर्गत शेतकऱ्याचा (farmers) दुर्दैवाने मृत्यू झाल्यास.अशावेळी शेतकऱ्याच्या पत्नीला 1500 रुपये पेन्शनचा लाभ दिला जातो. या योजनेत गुंतवणूक करून लहान आणि अल्पभूधारक शेतकरी त्यांचे आर्थिक भविष्य सुरक्षित करू शकतात.

शेतकरी मित्रांनो वेस्ट डीकंपोजरने तुमचे उत्पन्न वाढणार; फक्त 'या' पद्धतींचा करा वापर

आवश्यक कागदपत्रे

प्रधानमंत्री किसान मानधन योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड, ओळखपत्र, वय प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, बँक तपशील, पासबुक, मोबाईल नंबर, पासपोर्ट आकाराचा फोटो इत्यादी कागदपत्रे असणे आवश्यक आहे.

महत्वाच्या बातम्या 
देशातील प्रथम शेती अवजाराचे ग्रीन सिस्टिम शोरूम बार्शीत सुरू, शेतकऱ्यांना होणार फायदा
अरे व्वा! आता फक्त 40 हजारांत खरेदी करता येणार इलेक्ट्रिक स्कूटर; जाणून घ्या वैशिष्ट्ये
एलआयसीची 'ही' योजना ठरतेय अत्यंत फायदेशीर; फक्त 29 रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळतात 4 लाख रुपये

English Summary: government annual pension thousand rupees farmers beneficiary Published on: 31 August 2022, 04:37 IST

Like this article?

Hey! I am रूपाली उत्तम कदम. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters