1. यांत्रिकीकरण

ड्रोन बनवण्यात स्वदेशी नारा!! भारतात तयार होत आहेत मोठ्या प्रमाणावर ड्रोन, अनुदानही जास्त

सरकार शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना राबवत असते, ज्यातून शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळतो. सध्या आपण पाहिले तर शेती (Agricultural) व्यवसायात अत्याधुनिक यंत्राच्या वापरावर भर दिला जात आहे. यामधूनच गेल्या काही दिवसांपासून (Drone Farming) ड्रोन शेतीचा पर्याय उपलब्ध झाला आहे.

रूपाली उत्तम कदम
रूपाली उत्तम कदम
Agricultural Drones

Agricultural Drones

सरकार शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना राबवत असते, ज्यातून शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळतो. सध्या आपण पाहिले तर शेती (Agricultural) व्यवसायात अत्याधुनिक यंत्राच्या वापरावर भर दिला जात आहे. यामधूनच गेल्या काही दिवसांपासून (Drone Farming) ड्रोन शेतीचा पर्याय उपलब्ध झाला आहे.

जिल्ह्यातील बऱ्याच शेतकऱ्यांनी ड्रोनच्या सहाय्याने शेतात कीटकनाशकांची फवारणी केली. शेतीत ड्रोनचा वापर वाढविण्यासाठी केंद्र सरकारने (central government) पुढाकार घेतला आहे. भारतीय कंपन्यांनी कृषी ड्रोन निर्मिती सुरु केली आहे. आज आपण भारतातील प्रमुख ५ ड्रोन उत्पादक कंपन्यांची माहिती जाणून घेणार आहे.

1) जनरल एरोनॉटिक्स

ही देशातील अग्रगण्य कृषी ड्रोन कंपन्यांपैकी एक आहे. जनरल एरोनॉटिक्सच्या स्प्रे ड्रोन तंत्रज्ञान आणि कृषी ड्रोनद्वारे विविध कृषी रसायने, खते आणि विशेष पोषक घटकांसह फवारणी केली जाऊ शकते.

नगदी पिके, अन्न पिके, बागायती पिके आणि लागवड पिके यासाठी ड्रोन अनेक प्रकारे काम करू शकतात. यासोबतच जनरल एरोनॉटिक्सचे ड्रोन ९७% पाण्याची बचत करतात, तर ३० पट कार्यक्षमता आणि २० टक्के पैशांची बचत होते.

2) पारस एरोस्पेस

पारस एरोस्पेस प्रायव्हेट लिमिटेड (PARAS AEROSPACE PRIVATE LIMITED) ही पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नोलॉजी लिमिटेडची उपकंपनी आहे. पारस एरोस्पेसचे उद्दिष्ट भारत आणि जगामध्ये हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर या दोन्हींसाठी युएव्हीच्या (UAV) विविध आवश्यकतांसाठी उपाय उपलब्ध करून देते. ही एक आघाडीची स्वदेशी तंत्रज्ञान विकास कंपनी आहे.

कंपनीच्या प्रमुख वर्टिकलमध्ये मिलिटरी यूएव्ही, इंडस्ट्रियल यूएव्ही, स्वदेशी पेलोड डेव्हलपमेंट, रेग्युलेटरी कंप्लायन्स कन्सल्टन्सी आणि अ‍ॅग्रीकल्चर फोकस्ड यूएव्ही यांचा समावेश आहे. ही कंपनी अ‍ॅग्री-टेक सोल्यूशनसह ड्रोन ऑटोमेशनकडे लक्ष देणार्‍या कंपन्यांना तांत्रिक मदत करते.

पशुपालकांनो शेळीपालनासाठी सरकार देतंय 90 टक्के अनुदान; घ्या 'असा' लाभ

2) स्कायक्राफ्ट्स एरोस्पेस

हे जगातील सर्वात लहान स्प्रिंकलर ड्रोन आहे, जे फवारणी करण्यासाठी सोपे आहे. हे सेन्सर्स आणि ऑटोपायलट सिस्टमसाठी अचूक फवारणी आणि स्थानिकीकरण प्रणाली एकत्रित करते, ज्यामुळे ते बाजारपेठेतील सर्वात विश्‍वासार्ह हवाई फवारणी सोल्यूशन बनते.

अनेक फवारणी परिस्थितींसाठी शेतकरी ड्रोन (Drones) एक उत्कृष्ट फवारणी उपाय म्हणून विकसित केले गेले आहेत. हे मजुरांशिवाय किंवा दुर्गम भागात पिकांवर फवारणी करू शकते.

3) प्राइम युएव्ही

ही कंपनी कृषी सेवा ड्रोन सेवेचा वापर करून शेतकर्‍याला त्याचे उत्पादन वाढवण्यासाठी आणि कीटकनाशकांचा खर्च कमी करण्यास मदत करते. कृषी सेवा ड्रोन शेतीवर कीटकनाशक फवारणी करण्याच्या पारंपारिक पद्धतींच्या तुलनेत चांगली मानली जाते.

4) डम्स

डम्सचे कृषी ड्रोन कीटकनाशके आणि पीक पोषक फवारणी, पर्यावरण निरीक्षण, नैसर्गिक आपत्ती, पीक नमुना डेटा आणि वनस्पती संख्या, माती सुपीकता नकाशे आदींसाठी अत्यंत उपयुक्त मानली जातात.

'या' योजनेत फक्त 100 रुपयांपासून गुंतवणूक करा; मॅच्युरिटीनंतर मिळतील 16 लाख रुपये

कृषी ड्रोन योजनेअंतर्गत अनुदान

विद्यापीठे व सरकारी संस्था – १०० टक्के अनुदान (१० लाखांपर्यंत)
शेतकरी उत्पादक संस्था – ७५ टक्के अनुदान (७ लाख ५००००/- रुपये अनुदान)
शेतकरी उत्पादक संस्थांनी ड्रोन भाड्याने घेतल्यास (प्रति हेक्टरी ६०००/- रुपये अनुदान)
संस्थांनी कृषी ड्रोन चे प्रात्यक्षिक राबविल्यास – ३०००/- रुपये अनुदान
अवजारे सेवा सुविधा केंद्रांना ड्रोन खरेदी करताना – ५० टक्के अनुदान (५ लाखांपर्यंत)
कृषी पदवीधारकाने अवजारे सेवा केंद्र सुरु केल्यास – ५ लाखांपर्यंत अनुदान

महत्वाच्या बातम्या 
Onion Market Price: कांद्याच्या दरात चढ की उतार? जाणून घ्या बाजारभाव
Farmer Income : शेतकऱ्यांच्या शेतमालाला मिळणार योग्य दर; 22 ऑगस्ट रोजी होणार बैठक
Agricultural Business; फक्त 3 महिन्यांत बंपर कमाई; 'या' वनस्पतीच्या लागवडीतून शेतकरी होणार करोडपती

English Summary: 5 Companies India Manufacturing Agricultural Drones Published on: 20 August 2022, 05:15 IST

Like this article?

Hey! I am रूपाली उत्तम कदम. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters