1. ऑटोमोबाईल

Electric Cars News : 5 सेकंदात 100 किमीचा वेग! ही इलेक्ट्रिक कार धमाका करण्यासाठी सज्ज; सिंगल चार्ज मध्ये ४१८ किमी

Electric Cars News : देशात पेट्रोल डिझेलचे भाव दिवसेंदिवस गगनगाला भिडत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना पेट्रोल आणि डिझेलवरील गाड्या घेणे परवडत नाही. मात्र आता अनेक कंपन्यांनी पेट्रोल डिझेलला पर्याय म्हणून इलेक्ट्रिक गाड्या बाजारात लॉन्च करायला सुरुवात केली आहे. तसेच या गाड्यांमध्ये वेगवेलले फीचर्स देखील देण्यात येत आहेत.

electric car

electric car

Electric Cars News : देशात पेट्रोल डिझेलचे (Petrol Disel)भाव दिवसेंदिवस गगनगाला भिडत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना पेट्रोल आणि डिझेलवरील गाड्या घेणे परवडत नाही. मात्र आता अनेक कंपन्यांनी पेट्रोल डिझेलला पर्याय म्हणून इलेक्ट्रिक गाड्या (Electric Cars) बाजारात लॉन्च करायला सुरुवात केली आहे. तसेच या गाड्यांमध्ये वेगवेलले फीचर्स देखील देण्यात येत आहेत. 

जुलैमध्ये अनेक मोठ्या गाड्या लॉन्च झाल्या आहेत आणि येत्या काही दिवसांत आणखी काही होणार आहेत. यातील एक मोठे नाव व्होल्वोची इलेक्ट्रिक कार (Volvo's electric car) XC400 आहे. व्होल्वोची ही प्रीमियम कार 26 जुलै रोजी भारतात लॉन्च (Upcoming Electric Car)होणार आहे. ही पूर्णपणे इलेक्ट्रिक कार आहे. या 5 सीटर कारचा बॉडी प्रकार SUV आहे.

हे ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह लॉन्च केले जाईल. ही व्होल्वोची प्रीमियम कार आहे, ज्याची अंदाजे एक्स-शोरूम किंमत 65 लाख रुपये आहे. कंपनीने यामध्ये 78kWh क्षमतेचा बॅटरी पॅक लावला आहे.कंपनी ड्युअल मोटर सेटअपसह XC400 रिचार्ज ऑफर करत आहे.

IMD Alert : पुढील ३ दिवस या राज्यांमध्ये कोसळणार मुसळधार पाऊस ! IMD चा अलर्ट जारी

जे 408PS आणि 660Nm टॉर्क जनरेट करते. कंपनीचा दावा आहे की ही कार एका चार्जमध्ये 418 किमी प्रवास करू शकते. त्‍याच्‍या बॅटरीची पॉवर यावरून समजू शकते की ती केवळ 4.9 सेकंदात 100 किमी प्रतितास वेगाला स्पर्श करू शकते. या बॅटरी पॅकमुळे चारही चाकांपर्यंत पॉवर पोहोचेल.

40 मिनिटांत 80% चार्ज

या इलेक्ट्रिक कारला ग्राहक जलद चार्ज करू शकतील, असा कंपनीचा दावा आहे. रिपोर्ट्सनुसार, या कारची बॅटरी अवघ्या 40 मिनिटांत 80 टक्के चार्ज होऊ शकते. जलद चार्जिंगच्या सुविधेचा ग्राहकांना खूप फायदा होणार आहे, आता त्यांना कारच्या चार्जिंगसाठी जास्त वेळ प्रतीक्षा करावी लागणार नाही.

Tricky Questions: राष्ट्रपतीची निवडणूक लढवण्यासाठी कमाल आणि किमान वय किती आहे?

वैशिष्ट्ये

कंपनी या कारमध्ये एलईडी हेडलॅम्प देत आहे. याशिवाय कारमध्ये 9-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम देण्यात आली आहे. त्याचे डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर 12 इंच आकाराचे दिले जात आहे. त्याच्या पुढच्या जागा कूलिंग आणि हीटिंग फंक्शन्ससह उपलब्ध असतील. या कारमध्ये कंपनी पॅनोरामिक सनरूफ, 360 डिग्री कॅमेरा आणि ड्युअल झोन क्लायमेट कंट्रोल सारखी वैशिष्ट्ये असतील.

महत्वाच्या बातम्या :
PM Kisan Update: PM किसान बाबत मोठी माहिती! 10 दिवसांत करा हे काम, अन्यथा पुढचा हप्ता अडकेल
Farming Technique : शेतकरी आणि व्यवसायिकांचे अच्छे दिन ! फळे पिकवण्याचे नवे तंत्र बाजारात; सरकारकडून सबसिडीही

English Summary: Electric Cars News : 100 km speed in 5 seconds! This electric car Published on: 20 July 2022, 12:57 IST

Like this article?

Hey! I am पाराजी आबासाहेब शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters