1. पशुधन

गाभण शेळ्यांचे व्यवस्थापन आहे शेळीपालनातील यशाची पहिली महत्त्वाची पायरी, वाचा आणि जाणून घ्या

शेळीपालनाचे उत्पन्न आहे कळपामध्ये जन्माला येणाऱ्या करडावर अवलंबून असते. शेळी गाभण राहून दोन वर्षाला तीन वेळेस व्यायली पाहिजे. शेळीपालनामध्ये गाभण शेळी चे आरोग्य व तिच्या व्यवस्थापन याला खूप महत्त्व आहे. या लेखात आपण गाभण शेळ्यांच्या व्यवस्थापना विषयी माहिती घेऊ.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
goat rearing

goat rearing

शेळीपालनाचे उत्पन्न आहे कळपामध्ये जन्माला येणाऱ्या करडावर  अवलंबून असते. शेळी गाभण राहून दोन वर्षाला तीन वेळेस व्यायली  पाहिजे. शेळीपालनामध्ये गाभण शेळी चे आरोग्य व तिच्या व्यवस्थापन याला खूप महत्त्व आहे. या लेखात आपण गाभण शेळ्यांच्या व्यवस्थापना विषयी माहिती घेऊ.

सगळ्यात महत्त्वाचे गाभण शेळ्यांचे आहार व्यवस्थापन

  • चांगल्या वजनाचे सशक्त करडू जन्माला यावे यासाठी गाभण काळामध्ये योग्य व्यवस्थापन करावे.
  • शेळ्यांना वाळलेला,ओला चारा, खुराक व खनिज मिश्रण यांचा पुरवठा योग्य प्रमाणात करणे आवश्यक आहे.
  • सहज पचणारा योग्य प्रमाणात पशुखाद्य द्यावे.
  • गाभण काळातील शेवटचे किमान एक महिना विण्याच्या अगोदर समतोल आहाराचा पुरवठा करावा. गोठ्यातच फिरण्याची सोय असणे गरजेचे आहे.
  • गाभण काळात शेवटच्या तीन ते चार आठवड्यामध्ये गर्भाशयातील पिल्लांचा उत्तम वाढीसाठी उत्तम प्रतीच्या चाऱ्यावर दररोज 250 ते 350 ग्रॅम खुराक द्यावा.
  • स्वच्छ पाण्याचा पुरवठा करावा. थंड आणि पावसाचे पाणी देऊ नये त्यामुळे शेळी सर्दी सारखे आजाराला बळी पडतात.
  • पावसाळ्यामध्ये गाभण शेळ्यांना सुका चारा द्यावा.

गाबन शेळ्यांचे गोठा व्यवस्थापन

  • गोठ्यामध्ये गाबन शेळ्यांना वेगळे जागेत ठेवावे.
  • पावसापासून तसेच आद्रता युक्‍त हवे पासून बचाव करण्यासाठी गाभणशेळ्यांचा गोठ्यात ऊबदार वातावरण राहावे म्हणून दोन ते चार उंचीपर्यंत 100 ते 200 पावरचे बल्ब लावावेत.
  • रात्रीच्यावेळी गोठ्यामध्ये वाळलेले गवत, उसाचे पाचट अंथरावे. जेणेकरून जमिनीतील गारवा व ओलसरपणा  याचा गाभण शेळ्यांना त्रास होणार नाही.
  • मलमूत्र मुळे ओलसर झालेल्या जागेवर आठवड्यातून एक दोन वेळा चुन्याची भुकटी टाकावी. त्यामुळे गोठ्यात असलेली जिवाणू, विषाणू यांचा प्रादुर्भाव गाबन शेळ्यांवर कमी होतो.

शेळ्या गाभण राहण्याची लक्षणे

  • गाबन राहिलेली शेळी पुढील 21 दिवसात परत माजावर येत नाही.
  • तीन महिन्यानंतर शेळीचे पोट वाढू लागते तसे शेळीचे वजन वाढलेले दिसून येते.
  • गाभण राहिल्यानंतर शेळीची त्वचा तजेलदार होते.
  • शेवटच्या गाभण काळात शेळीचा खास दुधाने भरलेला दिसून येतो.
English Summary: this is first step of sucsess in goat rearing is precaution of goat in pregnancy period Published on: 08 March 2022, 02:23 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters