1. पशुधन

शेळीपालनामध्ये यशस्वी व्हायचे तर करा उत्तम व्यावसायिक व्यवस्थापन

भारतामध्ये शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन,कुकुट पालन आणि शेळीपालन यासारखे जोडधंदे शेतकरी बंधू करतात. या मधील शेळी पालन हा व्यवसाय कमी जागेत,कमी खर्चात आणि कमी कालावधीत चांगले उत्पन्न देणारा व्यवसाय मानला जातो.शेळीपालन व्यवसाय जर आपण आहार व्यवस्थापन तसेच व्यावसायिक व्यवस्थापन जर अचूक केले तर यश हमखास मिळते. शेळी हा प्राणी कमी खर्चिक असून त्याद्वारे मिळणारे उत्पन्न हे खर्चाच्या मानाने जास्त असते. या लेखात आपण शेळीपालनाचे व्यावसायिक पद्धतीने व्यवस्थापन कसे करावे, हे पाहणार आहोत.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
goat farming

goat farming

 भारतामध्ये शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन,कुकुट पालन आणि शेळीपालन यासारखे जोडधंदे शेतकरी बंधू करतात. या मधील शेळी पालन हा व्यवसाय  कमी जागेत,कमी खर्चात आणि कमी कालावधीत चांगले उत्पन्न देणारा व्यवसाय मानला जातो.शेळीपालन व्यवसाय जर आपण आहार व्यवस्थापन तसेच व्यावसायिक व्यवस्थापन जर अचूक केले तर यश हमखास मिळते. शेळी हा प्राणी कमी खर्चिक असून त्याद्वारे मिळणारे उत्पन्न हे खर्चाच्या मानाने जास्त असते. या लेखात आपण शेळीपालनाचे व्यावसायिक पद्धतीने व्यवस्थापन कसे करावे, हे पाहणार आहोत.

 शेळीपालन व्यवसायातील व्यवसायिक व्यवस्थापन

अ- करडांचे व्यवस्थापन

  • जेव्हा करडचा जन्म होतो तेव्हा जन्मल्याबरोबर करडाला आईला चाटू द्यावी म्हणजे त्यात मातृत्वाची भावना दृढ होते.
  • नाकातील चिकट द्रव्य साफ करावे.
  • तसे जन्मल्यानंतर अर्ध्या तासाच्या आत त्यांना चीक पाजावा.
  • करडे पंधरा दिवसाचे झाल्यानंतर त्यांना थोडा वाळलेला चारा चघळू  द्यावा.
  • करडांच्या जोमदार वाढीसाठी त्यांना 60 टक्के खाद्य व 40 टक्के चारा या प्रमाणात आहाराचे व्यवस्थापन करावे.
  • जास्तीत जास्त सहा महिने मध्ये 20 ते 25 किलो  वजनाचे  करडू विक्रीसाठी तयार होणे आवश्यक असते.

आ– पैदाशीच्या नराची व्यवस्थापन

  • दीडवर्षा पेक्षा कमी वयाचा नरपैदाशीसाठी वापरू नये.
  • नराला कायम शेळ्यांच्या कळपात ठेवू नये.
  • पैदास हंगामामध्ये त्याच्या पोटावरील केस कापावेत.
  • दोन नर पैदास हंगामामध्ये एकत्र ठेवू नयेत म्हणजे त्यांच्यात मारामारी होणार नाही.
  • पैदास हंगामात नरांना सकस प्रथिनयुक्त आहार द्यावा जेणेकरून त्यांची प्रजनन क्षमता वाढेल.

इ– माद्यांचे व्यवस्थापन

  • माद्याया नऊ महिने ते एकवर्षापर्यंत वयात येतात.
  • पैदास हंगामामध्ये त्यांना सकस हिरवा चारा मिळेल याची काळजी घ्यावी.
  • पैदास हंगामापूर्वी आणि गाभण काळातील शेवटच्या महिन्यात आहार व खाद्य वाढवावे म्हणजे जुळ्यांचे प्रमाण वाढेल आणि वजनदार करडे जास्त मिळतील.
  • गाभण व दुभत्या माद्यांच्या आहारात क्षारमिश्रणाचा वापर करावा.
  • गाभण शेळ्या इतर कळपा पासून वेगळे ठेवाव्यात.
  • विलेल्या शेळी ची काळजी घ्यावी, तिच्या मागील भाग स्वच्छ धुवावा सडे फोडावीत व करडू व्यवस्थित पाजावे.

ई– शेळ्यांचे चरण्याचे व्यवस्थापन

  • उन्हाळ्यात सकाळी लवकर व संध्याकाळी उशिरापर्यंत शेळ्या चारा व्यात.
  • हिवाळ्यात सूर्योदयानंतर शेळ्या चरण्यास न्याव्यात  कारण दव पडलेल्या गवतावरशेळ्या चरल्यास  सर्दी व  फुफ्फुसदाह  तसेच घशाचे आजार होण्याची शक्यता असते.
  • साठवलेल्या पाणवठ्यावर जेथेगोगलगाई आहेत अशा ठिकाणी शेळ्या चारूनयेत .
  • शेळ्या चारायला नेण्यापूर्वी बाभळीचाडहाळा, शेंगा खायला दिल्यास शेळ्या छानचरतात.
  • आठवड्यातून एकदा लिंबाचा डहाळा अवश्य द्यावा म्हणजे जंताचे प्रमाण कमी होते.
English Summary: occupational skill in goat farming Published on: 16 September 2021, 11:31 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters