1. पशुधन

पावसाळ्यात कशी बर ठेवणार शेळींची निगा? जाणुन घ्या

महाराष्ट्रात ग्रामीण भागात शेतीसोबतच शेळीपालन करून शेतकरी आपला उदरनिर्वाह करतातं, म्हणुनच शेळीपालन हा अल्पभूधारक शेतकऱ्यांचा पाठीचा कणा आहे असे म्हटले तरी काही अर्थहीन ठरणार नाही. शेळीपालन शेतकऱ्यांसाठी कुण्या बँकेच्या एटीएम पेक्षा काही कमी नाही अहो खरंच आहे पशुपालन म्हणजेच एनी टाइम मनी! ग्रामीण महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी आणि तरुणांना स्वयंरोजगाराशी जोडण्यासाठी शेळीपालन हा एक चांगला पर्याय बनू शकतो.

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
goat precaution

goat precaution

महाराष्ट्रात ग्रामीण भागात शेतीसोबतच शेळीपालन करून शेतकरी आपला उदरनिर्वाह करतातं, म्हणुनच शेळीपालन हा अल्पभूधारक शेतकऱ्यांचा पाठीचा कणा आहे असे म्हटले तरी काही अर्थहीन ठरणार नाही. शेळीपालन शेतकऱ्यांसाठी कुण्या बँकेच्या एटीएम पेक्षा काही कमी नाही अहो खरंच आहे पशुपालन म्हणजेच एनी टाइम मनी! ग्रामीण महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी आणि तरुणांना स्वयंरोजगाराशी जोडण्यासाठी शेळीपालन हा एक चांगला पर्याय बनू शकतो.

 त्यामुळे शेळीपालन ग्रामीण भागात रोजरगाराचा एक उत्तम मार्ग बनू शकतो आणि योग्य निगा घेऊन शेतकरी बक्कळ कमाई देखील करू शकतात. आज आपण शेळीपालणातील सर्वात महत्वाचा घटक म्हणजेच व्यवस्थापन ह्याविषयीं जाणुन घेणार आहोत.

शेळीला ओलावा आवडत नाही, त्यांना कोरड्या जागी राहणे पसंत असते. त्याच्या राहण्याच्या ठिकाणी असलेल्या ओलावामुळे त्याच्यामध्ये विविध रोग येतात. म्हणुन पावसाळ्यात शेळीपालनात व्यवस्थापन खुप महत्वाचे असते

 शेतीबरोबर शेळीपालन करणे फायद्याचे ठरेलं

शेळीपालनात शेळ्यांकडे पावसाळ्यात विशेष लक्ष द्यावे लागते, कारण या हंगामात वातावरणात दमटपणा असतो. पावसामुळे, शेळयांना जंगलात व्यवस्थित चरायला भेटत नाही.

. त्यामुळे त्यांच्यासाठी चाऱ्याचीही समस्या उद्भवते. महाराष्ट्रात ग्रामीण भागात बरेचसे शेतकरी व भूमिहीन शेतकरी शेळीपालन करतात. शेळीपालन हे नेहमीच शेतकऱ्यांसाठी एक अतिरिक्त उत्पन्नाचे साधन राहिले आहे.

 पावसाळ्यात शेळी आजारी पडण्याचा धोका असतो

प्रत्येक सीजनमध्ये शेळी पालनात निगा ठेवताना थोडा बदल केला पाहिजे, अशातच आता पावसाळा सुरू आहे. तर शेळीची काळजी कशी घ्यावी, हे आपण जाणुन घेणार आहोत. पावसाळा येताच अनेक रोगही शेळ्यांमध्ये येतात. म्हणून, या पावसाळ्यात, त्यांच्या वांशिक क्षमतेनुसार उत्पादन घेण्यासाठी काही गोष्टींकडे लक्ष देणे फार महत्वाचे ठरते.

. जर त्यांची काळजी घेतली गेली, तर शेळ्या आणि त्यांच्या करडांमध्ये आजाराचे आणि मृत्यूचे प्रमाण कमी होते. त्याचबरोबर, त्यांची वाढ देखील चांगली होते, ज्यामुळे शेतकऱ्यांना शेळीपालनातून जास्त नफा मिळू शकतो.

 शेळीपालन करत असाल तर पावसाळ्यात या गोष्टीची काळजी घ्या

  • पावसाळ्यात, शेळ्यांशी संबंधित काही विशेष गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे, मग ते अल्पभूधारक व भूमिहीन शेतकरी असोत किंवा मोठ्या प्रमाणात शेळीपालन करणारे शेतकरी असोत.

 

  • पाऊस सुरू होण्यापूर्वी शेळ्यांच्या गोठ्याकडे किंवा शेळ्या ज्या ठिकाणी ठेवतात त्याकडे लक्ष दिले पाहिजे. हे पाहिले पाहिजे की गोठ्याला दुरुस्तीची आवश्यकता आहे की नाही. जेव्हा शेळ्याच्या गोठ्यात पाणी साचते तेव्हा त्यांना निमोनियाचा धोका वाढतो.

 

 

  • शेतकरी त्यांच्या घराशेजारी गाई किंवा शेळ्या ठेवतात, त्यामुळे शेळ्या असतात ते शेड खूप ओले राहते. म्हणून, हे लक्षात घ्यावे की शेळी ठेवत असलेल्या शेडची फरची कोरडी राहावी. तसेच शेडमध्ये हवा खेळती असावी.

 

  • शेळ्यांच्या आहाराकडे विशेष लक्ष दिले पाहिजे, कारण या हंगामात जास्त हिरवा चारा आपल्याकडे असतो आणि शेळ्यांना जास्त हिरवा चारा खायला घालतो, ज्यामुळे शेळ्यांना अनेक समस्या निर्माण होतात.

 शेळ्यांना संतुलित आहार द्यावा, जेणेकरून पावसाळ्यात शेळ्यांना अन्नाची कमतरता भासू नये.

English Summary: keep management of goat farming in reiny season Published on: 17 September 2021, 12:14 IST

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters