1. कृषीपीडिया

नारळ लागवड करायची? तर मग करा अशा पद्धतीने रोपांची निवड आणि सुधारित जाती

नारळ लागवड करायची असेल तर नारळ लागवडीसाठी एक वर्षे वयाची रोपे निवडणे अत्यंत गरजेचे असते.तसेच लागवडीसाठी निवडलेल्या रोपाला पाच ते सहा पाने असावीत व रोपे निरोगी व जोमदार वाढीचे असावीत. तसेच दोन झाडातील अंतर लागवड करताना योग्य ठेवणे गरजेचे आहे.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
coconut tree

coconut tree

नारळ लागवड करायची असेल तर नारळ लागवडीसाठी एक वर्षे वयाची रोपे निवडणे अत्यंत गरजेचे असते.तसेच लागवडीसाठी निवडलेल्या रोपाला पाच ते सहा पाने असावीत व रोपे निरोगी व जोमदार वाढीचे असावीत. तसेच दोन झाडातील अंतर लागवड करताना योग्य ठेवणे गरजेचे आहे.

 जर शिफारशीप्रमाणे योग्य अंतर ठेवले नसल्यास फळे उशिरा येऊ शकतात किंवा फळे न लागणे या समस्या निर्माण होतात. नारळ लागवड करताना दोन ओळींत व दोन रोपात 7.5×7.5 अंतर असणे गरजेचे आहे. कुंपणाच्या कडेने किंवा बांधाच्या कडेने एका ओळीत नारळाची लागवड करायची असेल तर नारळाच्या दोन झाडातील अंतर सात मीटर असणे आवश्यक आहे.

 नारळाच्या काही सुधारित जाती

 नारळाच्या जातीमध्ये दोन प्रकार पडतात 1- उंच जातींचा प्रकार व दुसरा म्हणजे ठेंगू जात

उंच जातीच्या प्रकार आगोदर पाहू

  • प्रताप- या जातीच्या नारळाचा आकार मध्यम गोल असून या जातींना फुलोरा लागवडीपासून सात ते सात वर्षात येतो. योग्य मशागत व व्यवस्थापन असल्यास एक नारळापासून सरासरी 150 नारळ मिळतात.
  • वेस्ट कोस्ट टोल किंवा बानवली– ही जात भारताच्या पश्चिम किनार्‍यावर लावली जाते. कोकणामध्ये तिला बाणवली या नावाने ओळखतात.या जातीच्या आयुष्य सत्तर ते ऐंशी वर्षे असते. प्रत्येक झाडापासून प्रतिवर्षी 50  ते शंभर नारळ मिळतात. तेलाचे प्रमाण 67 ते 70 टक्के असते.
  • लक्षदीप ऑर्डिनरी ( चंद्र कल्प)- ही नारळाची जात भारतातील लक्षद्वीप बेटां जवळ आढळते.या जातीपासून प्रति वर्ष 80 ते 178 फळे मिळतात. सरासरी खोबऱ्याचे प्रमाण 140 ते 180 ग्रॅम असते  व तेलाचे प्रमाण 72 टक्के असते.डॉ. बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठाने तसेच भाटी येतील नारळ संशोधन केंद्राने ही जात महाराष्ट्रासाठी प्रमाणीतकेले आहे.
  • लक्षदीप मायको – ही जात ही लक्षदीप बेटा जवळ आढळते. एका नारळामध्ये खोबऱ्याचे प्रमाणे 80 ते 100 ग्रॅम असते. व तेलाचे प्रमाण 75 टक्के असते. ही जात गोटा नारळ तयार करण्यासाठी उत्तम आहे.
  • फिलिपिन्स ऑर्डिनरी- या जातीची लागवड मोठ्या प्रमाणात फिलिपिन्स येथे केली जाते. या जातीपासून वार्षिक नारळाचे उत्पादन प्रति झाड 90 ते 200 नारळ असून सरासरी 105 नारळ आहे. तेलाचे प्रमाण 69 टक्के असते.
  • केरा बस्तर – ही जात महाराष्ट्रासाठी शिफारशीत करण्यात आली असून नारळाचे उत्पादन प्रति प्रति झाड प्रति वर्ष 110  नारळ इतके  आहे. यामध्ये तेलाचे प्रमाण 2.04 टक्के असते

2-नारळाच्या ठेंगु जात

  • चौघाट ग्रीन डॉर्फ– ही जात केरळ राज्यातील त्रिचूर जिल्ह्यात चौघाटामध्ये प्रथम आढळली. या जातीस तीन ते चार वर्षात फळधारणा होते. प्रति झाडापासून प्रति वर्ष 30 ते 160 नारळ मिळतात. यामध्ये खोबर्‍याचे प्रमाण 38 ते 100 ग्रॅम असते सरासरी 60 ग्रॅम खोबरे मिळते. यामध्ये तेलाचे प्रमाण 72 टक्के असते.
  • चौघाट ऑरेंज डॉर्फ– ही जात देखील केरळ राज्यातील त्रिचूर जिल्ह्यात प्रथम आढळली. या झाडाचे प्रतिवर्षी उत्पादन 50 ते 120 रुपये असून सरासरी 65 नारळ इतकी आहे. खोबर्‍याचे प्रमाण 112 ते 188 ग्राम असून  सरासरी 150 ग्रॅम असते.केंद्रीय रोपवन पिके संशोधन संस्था कासारगोड केरला यांनी ही जात शहाळ्याच्या पाण्यासाठी प्रमाणित  केले आहे.
  • मलायन ग्रीन डॉर्फआणि मलायन येलोडॉर्फ–ही जात मलेशियातील असून पानाच्या देठाचे  रंग, फुलोरा व फळांचा रंग यावरून त्यांना मलायनग्रीन डॉर्फअसे म्हणतात. त्याचे प्रति झाड प्रति वर्ष नारळ उत्पादन हे 39 ते 120 नारळ असून सरासरी 89 आहे.नारळात 138 368 ग्रॅम खोबरे असून सरासरी 66 नारळ आहे. तेलाचे प्रमाण 66 ते 67 टक्के असते.
  • गंगाबोडम– या जातीची लागवड आंध्रप्रदेशातील पूर्व गोदावरी जिल्ह्यात आढळून येते. ही जात चार ते पाच वर्षात फलधारणा येते. प्रति वर्षी प्रति झाड नारळाचे उत्पादन 50 ते 90 नारळ व सरासरी 68 नारळ इतके आहे. सरासरी 160 ग्रॅम खोबरे आणि 68% तेलाचे प्रमाण असते.
English Summary: variety of coconut crop maharashtara Published on: 12 September 2021, 10:05 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters