1. कृषीपीडिया

हे खोडवे मरणे शेतीसाठी गरजेचेच आहे.

ग्लायसेल या तणनाशकाने खोडवे मारता येणे शक्‍य असल्याचे तोपर्यंत ज्ञात झाले होते. 2005चे भाताचे पीक शून्य मशागतीवर घेण्याचे पक्के केले.

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
हे खोडवे मरणे शेतीसाठी गरजेचेच आहे.

हे खोडवे मरणे शेतीसाठी गरजेचेच आहे.

ग्लायसेल या तणनाशकाने खोडवे मारता येणे शक्‍य असल्याचे तोपर्यंत ज्ञात झाले होते. 2005चे भाताचे पीक शून्य मशागतीवर घेण्याचे पक्के केले. त्या साली एप्रिल-मे महिन्यात सलग वळीव पाऊस चालू होता.

अनेकांना मशागत करण्यास वावच मिळाला नाही. काही जणांना पेरणीही करता आली नाही. मी निश्‍चितच होतो. मशागत नसल्याने आता कुरीने (पेरणी यंत्र) पेरणी करणे शक्‍य नव्हते. अशा परिस्थितीत ओल्या रानात हाताने टोकण करून पेरणे हा पर्याय अवलंबला. भात पीक उत्तम आले. भाताची कापणी झाली. सरी वरंबे जुने तसेच होते. आता उसासाठी नांगरणी, सऱ्या सोडणे, नाके करणे, वगैरे पेरणीपूर्व कामे बंद करून जुन्या सऱ्यांचे तळात एक बळिराम नांगराचे तास मारले व नेहमीप्रमाणे उसाची लावण केली.

कांडी पेरणी पुरती मशागत झाली असल्याने लावण, उगवण, फुटीची व वाढीची अवस्था यात कोणतीच अडचण आली नाही. आजपर्यंत परंपरागत पद्धतीने मशागत करून ऊस पिकविण्यात 25-30 वर्षे गेली होती. बिनानांगरणी पद्धतीच्या शेतातील उसाची वाढ पूर्वीपेक्षा किती तरी उजवी दिसत होती. पुढे ऊस तुटून कारखान्याला गेला आणि लक्षात आले

उत्पादनाचा आलेख परत वरच्या दिशेने निघाला आहे. याला कारण जमिनीची सुपीकता व उत्पादकता परत वाढू लागली आहे. मला बाह्य बाजारी उपाय करून उत्पादकता वाढवायची नव्हती. 25-30 वर्षांपूर्वी मूळ जमिनी सुपीक असल्यामुळे जे चांगले उत्पादन मिळत होते. तशी सुपीक जमीन करून उत्पादन वाढवायचे होते.

वरील तंत्रातून त्यासाठीचा मार्ग सापडला आहे. याची खात्री पटत चालली होती. दरम्यान याच काळात उसानंतर बिनानांगरणी पद्धतीने भुईमुगाचे पीक घेतले तेही चांगले आले. यातून कोणत्याही पिकाच्या वाढीसाठी नांगरणीची पूर्वमशागतीची आवश्‍यकता नाही, असा निष्कर्ष निघाला. चांगली पूर्वमशागत झाली पाहिजे या परंपरागत विचाराच्या हा विचार पूर्ण विरुद्ध दिशेचा असल्याने या मागील अनेक पायाभूत शास्त्रीय संदर्भांचा अभ्यास करणे गरजेचे होते.

नांगरणी कुळवणी मेलपट मारणे वगैरे पूर्वमशागतीची कामे करणे हे कांही सुधारित शेतीने आपल्याला दिलेले मंत्र नाहीत. शेकडो वर्षे आपण हे काम करीत आलेलो आहे. शेतीच्या वाटचालीत सतत जास्त चांगली मशागत करणारी यंत्रे शोधण्याच्या कामात आजही शास्त्रज्ञ मंडळी गुंतलेली आहेत. जगभर यावर कोट्यवधीचा निधी दरवर्षी खर्चिला जात आहे. या सर्व कामाची गरजच नाही, असे सांगितल्यास ते कोणीही मान्य करणार नाही.

जगात नांगरणी प्रथम का चालू झाली. ती आजवर टिकून का राहिली? आपण बैलाकडून ट्रॅक्‍टरकडे गेल्यानंतर शेतकऱ्यांचा मशागत जास्त करणेकडे कल वाढत चालला आहे. मुळात नांगरणीचा उद्देश काय असावा, यांचा शोध घेणे गरजेचे होते. शेतीशास्त्राच्या पुस्तकात नांगरणी चांगली कशी करावी याची माहिती मिळेल, मूळ उद्देश सापडणार नाही. चिंतन केल्यानंतर मला सापडलेले मूळ उद्देश खालीलप्रमाणे आहेत.

1) आपल्याला बी पेरता आले पाहिजे. 

2) ओळीत करावयाचे असेल तर रानबांधणीसाठी नांगरणी 

दुय्यम उद्देश 

1) तण मारणे 

2) सेंद्रिय खत मातीत मिसळणे

या उद्देशासाठी आपण जमिनीची मशागत करीत असतो. शेतकऱ्यांना विचारल्यास शेतकरी सांगतील की पुढील पिकाच्या मुळांच्या चांगल्या वाढीसाठी जमीन भुसभुशीत करणे गरजेचे आहे. जमिनीत असणाऱ्या किडींच्या अवस्था मारणेसाठी नांगरणी गरजेची आहे. परंतु यात फारसा अर्थ नाही. वरील चार कामे आपण बिना नांगरता करू शकत असलो, तर आपल्याला नांगरणी पूर्वमशागत करण्याची कोणतीच गरज नाही.

बी माती आड करणेसाठी सुरवातीला भाताचे बाबत टोकण व पुढे टोकणीसाठीचे मनुष्यबळ वाचविणेसाठी विसकटून भातपेरणीचे तंत्र विकसित केले आहे. उसासाठी सुरवातीला सरीचे तळात कांडी पुरणे पुरती मशागत करीत होतो. आता तीही बंद केली कांडी लावणीसाठी एक डोळ्याची कांडी सरीत पहारीने भोक पाडून उभी घालणे अगर बाहेर रोपे तयार करून कुदळीने लहान खड्डा पाडून त्यात रोप लावले जाते.

पाणी पाजण्यासाठी जुन्या सरी-वरंबे तसेच वापरले जातात. तण मारण्यासाठी तणनाशकाचा वापर केला जातो. चांगले कुजलेले खत आता वापरणे बंद केले आहे. शक्‍य झाल्यास जनावरांचे शेण विसकटून आच्छादनात टाकले जाते. सेंद्रिय खताची गरज प्रामुख्याने मागील पिकाचे अवशेष व तणांचे अवशेष जागेलाच कुजवून भागविली जाते. इथे सेंद्रिय खत मुद्दाम औजाराने मातीत कालविण्याचे कामच करावे लागत नाही. ही चार मुख्य कामे बिना नांगरता होऊ शकल्याने मागील नऊ वर्षांपासून माझी शेती 100 टक्के नांगरणी अगर पूर्वमशागतीशिवाय उत्तम प्रकारे चालू आहे. उत्तम प्रकारे म्हणण्याला एक शास्त्रीय आधार आहे.

        जर नांगरणी ची फार अशी आवश्यकता नसेल तर प्रत्येक शेतकरी वेळ पैसा आणि मेहनत वाचवू शकतो त्याचबरोबर जमिनीचा पोत व उत्पादन ही वाढेल या पद्धती बाबत जनजागृती फारशी दिसत नाही

 

शेतकरी मित्र

विजय भुतेकर सवणा

9689331988

English Summary: This stems dead important for farming need Published on: 10 February 2022, 03:50 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters