1. कृषीपीडिया

रब्बी साठी मका पिकाचे हे नवीन वाण, बाजारातील सर्वोत्तम वान

या वर्षी नवीन मका पिकाचे नवीन वाण आले आहे. मार्केटमधील हे सर्वोत्तम वानआहे.

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
रब्बी साठी मका पिकाचे हे नवीन वाण,  बाजारातील सर्वोत्तम वान

रब्बी साठी मका पिकाचे हे नवीन वाण, बाजारातील सर्वोत्तम वान

या वर्षी नवीन मका पिकाचे नवीन वाण आले आहे.मार्केटमधील हे सर्वोत्तम वानआहे. त्याचे नाव आहे सुंदरा2 मगच्या वर्षी रब्बी साठी ट्रायल म्हणून दिलेले होते, वेगवेगळ्या शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीच्या प्रकारानुसार, व्यवस्थापन आणि नियोजनानुसार एकरी उत्पन्न 35 ते 55 क्विंटल आले होते. माझ्या मते आज बाजारातील सर्वोत्तम वाण आहे16 सप्टेंबर पासून आपल्या भगवती सीड्स चोपडा, येथे उपलब्ध झाला आहे. किंमत 1600 रु रब्बी हंगामातील मका साधारणतः 20 सप्टेंबर ते

30 नोव्हेम्बर या कालावधीत लावल्यास चांगले उत्पन्न मिळते.If planted during the period of 30th November, it gives good yield. उशिरा 1 डिसेंबर पासून 1 जानेवारी पर्यंत लागवड केलेल्या मक्याची उत्पादकता कमी कमी होत जाते.

हे ही वाचा -झिंक ह्या सूक्ष्म अन्नद्रव्याचे मका पिकामध्ये महत्व व वापरण्याची पद्धत

उच्च उत्पादन क्षमता असणाऱ्या सुंदरा92 ह्या वाणापासून जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी.ह्या वाणाची लागवड 2 फूट×10 इंच या अंतरावरच करावी.क्याचे जास्त उत्पन्न यावे या साठी एकरी झाडांची संख्या 22000ते 24000 असावी, 1 एकरसाठी 7 ते 8 किलो बियाणे वापरावे. काळ्या कसदार जमिनीतच लागवड करावी, हलक्या जमिनीत या वाणाची लागवड करू नये.

ठिबकवर लागवड 4 फूट किंवा 5 फूट अंतरावर नळी असेल तर नळीच्या दोन्ही बाजूला साधारणतः 8 ते 9 इंच अंतरावर लागवड करावी , दोन रोपातील अंतर 10 इंच ठेवावे.योग्य नियोजन व व्यवस्थापन असल्यास रब्बी हंगामात लागवड केलेल्या मक्याच्या एका कणसापासून साधारणतः 225 ते 250 ग्रॅम मक्याचे उत्पन्न मिळते.वॉर्डन किंवा सिडगार्ड या औषधाची बीज प्रक्रिया करूनच लागवड करावी.खते एक एकर साठीलागवड करतानाच 2 बॅग डीएपी, दीड बॅग पालाश

10 किलो बेनसल्फ, आनि 1किलो मोनोसिल(पोट्याशीयम ह्युमिक अर्थोसिलिसीक ऍसिड) असा खतांचा बेसल डोस द्यावा. (पेरणी करतानाच 2 बॅग डीएपी व दीड बॅग पोट्याश एकाच वेळेस द्यावे)bयुरिया दोन ते 3 हप्त्यात विभागून द्यावा.1 महिन्याने 1 बॅग युरिया 20 किलो झिंक सल्फेट द्यावे.50 व्या दिवशी 1ते दीड बॅग युरिया द्यावा. ठिबक वर लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांनी, फॉस्फोरीक ऍसिड, युरिया अमोनियम नायट्रेट, अमोनियम पोलीफॉस्फेट, पोत्याशीयम पोली

फॉस्फेट, के50, कॅल्शियम हायड्रोजन फॉस्फेट, हायकार्बया लिक्विड खतांचा वापर केल्यास त्पादकतेत निश्चितच वाढ होते.20/21 व्या दिवशी तणनाशकाचा वापर करावा.2 वेळा अळी नाशकांची फवारणी करावी अळीनाशक फवारणी सोबत स्मार्ट (झिंक ऑक्साईड 39%) 25 ते 30 मिली वापरावे.पेरणी नंतर साधारणतः वापसा स्थिती पाहून 10 ते 12 दिवसाच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या द्याव्या.वर सांगितल्या प्रमाणे नियोजन व व्यवस्थापन केले तरच रब्बी हंगामातील मक्याचे उत्पन्न एकरी 40 ते 55 क्विंटल पर्यंत येते.

 

शिंदेसर

9822308252

English Summary: This new variety of maize crop for Rabbi, the best variety in the market Published on: 24 September 2022, 07:13 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters