1. कृषीपीडिया

Cotton Crop: कपाशीवर दिसत आहे आकस्मिक मर रोग, 'या' उपाययोजना ठरतील परिणामकारक

कपाशी हे खरीप हंगामातील प्रमुख पीक असून महाराष्ट्रातील बऱ्याच भागांमध्ये कपाशी लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. जर आपण कपाशी पिकाचा विचार केला तर विविध प्रकारचे रोग आणि किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात या पिकावर होत असतो. जर आपण किडीचा विचार केला तर विविध प्रकारच्या रसशोषक किडीमुळे या पिकाचे नुकसान होते.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
cotton crop management

cotton crop management

कपाशी हे खरीप हंगामातील प्रमुख पीक असून महाराष्ट्रातील बऱ्याच भागांमध्ये कपाशी लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. जर आपण कपाशी पिकाचा विचार केला तर विविध प्रकारचे रोग आणि किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात या पिकावर होत असतो. जर आपण किडीचा विचार केला तर विविध प्रकारच्या रसशोषक किडीमुळे या पिकाचे नुकसान होते.

नक्की वाचा:महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे पिकांचे झालेल्या नुकसान भरपाई संदर्भात शेतकऱ्यांसाठी महत्वपुर्ण सुचना

जर आपण आताची परिस्थिती पाहिली तर महाराष्ट्रात सगळीकडे जोरदार पावसाचे आगमन झाल्याने बऱ्याच ठिकाणी शेतामध्ये खूप जास्त प्रमाणात पाणी साचले आहे व अजूनही पाऊस ओसरला नसल्याने शेतात साचलेले पाणी आहे तसेच आहे.

त्यामुळे कपाशी पिकावर एक वेगळ्या प्रकारचे संकट आले असून कपाशीच्या शेतातील झाले अचानक जागेवर कोमेजू लागली आहेत व यालाच आकस्मिक मर रोग असे म्हटले जाते.  या रोगाबाबत आपण या लेखात माहिती घेऊ.

 कपाशी वरील आकस्मिक मर रोगाची कारणे

 बऱ्याचदा असे होते की, पावसाचा मोठा खंड पडतो व त्यामुळे जमीन उन्हामुळे तापते व अशी परिस्थिती उद्भवेल्यानंतर जेव्हा मोठा पाऊस पडतो किंवा आपण कपाशी पिकाला पाणी देतो तेव्हा झाडाला एक प्रकारचा शॉक बसतो व झाड कोमेजायला लागते व वाळायला लागते.

अचानक खंडानंतर पाऊस पडल्यानंतर जास्तीत जास्त 36 तासाच्या पुढे या रोगाचे लक्षणे झाडावर दिसायला लागतात. यामुळे खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसू शकतो.

नक्की वाचा:कापूस पिकातील लाल्या बोंड सड जाणून घ्या ओळख आणि व्यवस्थापन

आकस्मिक मर रोगाच्या नियंत्रणासाठी उपाययोजना

 यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा जास्त पाऊस पडून शेतामध्ये पाणी साचते तेव्हा अशा साचलेल्या पाण्याचा जितका पटकन निचरा करता येईल तेवढा निचरा करावा व जमीन कोळपणी किंवा खुरपणी करून मोकळी करावी.

दुसरा उपाय म्हणजे कुठलाही प्रकारचा वेळ न घालवता 200 ग्रॅम युरिया आणि 100 ग्रॅम पालाश म्हणजे पोट्याश आणि 25 ग्रॅम कॉपर ऑक्‍सिक्‍लोराईड प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून या द्रावणाची प्रत्येक झाडाला 150 मिलि याप्रमाणे ड्रेचिंग करावी.

नाहीतर यासाठी एक किलो 13:00:45 व दोन ग्रॅम कोबाल्ट क्लोराईड आणि 250 ग्रॅम कॉपर ऑक्‍सिक्‍लोराईड 200 लिटर पाण्यात मिसळून या द्रावणाची प्रती झाड 100 मिली ड्रेचिंग करावी. ही उपाययोजना शेतामध्ये झाडे वाळायला लागलेली दिसताच 24 ते 36 तासाच्या आत करावी.  जेणेकरून होणारी पुढील नुकसान शेतकरी बंधूंना टाळता येईल.

नक्की वाचा:Crop Tips: 'या' गोष्टींकडे लक्ष दिल्यास वांग्याचे उत्पादन वाढेल हमखास, वाचा सविस्तर

English Summary: this is is wilt disease in cotton crop and save to farmer from crop damage Published on: 17 September 2022, 11:45 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters