1. कृषीपीडिया

महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे पिकांचे झालेल्या नुकसान भरपाई संदर्भात शेतकऱ्यांसाठी महत्वपुर्ण सुचना

महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बंधू आणि भगिनींना महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे पिकांचे झालेल्या नुकसान भरपाई संदर्भात शेतकऱ्यांसाठी महत्वपुर्ण सुचना

महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे पिकांचे झालेल्या नुकसान भरपाई संदर्भात शेतकऱ्यांसाठी महत्वपुर्ण सुचना

महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बंधू आणि भगिनींना महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या माध्यमातून सुचित करण्यात येते की,आपल्या महाराष्ट्रात दिनांक १० सप्टेंबर पासून मुसळधार पावसामुळे,अतिवृष्टी,भुखनन विज अशांमुळे आपल्या पिकांचे खुप मोठे नुकसान झाले आहे* किंवा काही परिसरात आता होत आहे.आपल्याला सदर नुकसान भरपाई मिळावी यासाठी आपण खालील प्रमाणे प्रक्रिया करावी.

१)गावातील सरपंच व महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी नी आपल्या गावाचे तलाठी/ तहसीलदार यांना पुर्ण शिवाराचा सरसकट पंचनामा करण्याची विनंती निवेदनाद्वारे करावी.The Tehsildar should be requested to do a panchnama of the whole Shivara through a statement.२) आपण जर प्रधानमंत्री फसल विमा योजनेत पिक विमा घेतला असेल तर (बैंक कडून, वि.का.सोसायटी कडून किंवा सी.एस.सी.कडून वयक्तिक रित्या आपण आपल्याला मिळालेल्या पिक विमा पावती च्या आधारे )

आपल्या खालीलपैकी कोणत्याही पद्धतीने पिक विमा कंपनीला नुकसान झाल्यापासून ७२ तासाच्या आत कळवावे लागेल तरच आपल्या पिकाचा कंपनी कडून पंचनामा केला जातो व भरपाई मिळत असते३)कंपनी ला सुचना करण्याची पध्दत (१)हेल्पलाईन नंबर 1800116515 यावर सकाळी ९ ते ५ वाजेपर्यंत संपर्क साधावा (२) आपण ज्या कंपनी कडून विमा घेतला आहे त्यांच्या पावती वरिल ईमेलद्वारे(३) सर्वात

उत्तम पर्याय म्हणजे Google play store वरून Crop Insurance App डाऊनलोड करून त्याव्दारे आपण पूर्वसुचना देऊ शकता.या संदर्भात युट्युबवर व्हिडिओ पहावेत आम्ही महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या माध्यमातून विनंती करतो की गावाचे सरपंच, वि.का.सोसायटीचे चेअरमन, सचिव, बैंकेचे अधिकारी, सी.एस.सी.संचालक, रोजगार सेवक,तसेच

महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या सर्व शाखांचे पदाधिकारी, तालुक्यातील पदाधिकारी, जिल्हा पदाधिकारी या सर्वांनी कोणताही पक्षपाती पणा न करता आपल्या शेतकरी बंधूंना सरळ सरळ मदत मार्गदर्शन करावे.

 

सुनील देवरे(पाटील)

संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष व शेतकरी नेते महाराष्ट्र शेतकरी संघटना व निमंत्रक स्वराज्य संघटना

 Mo - 9890875238

English Summary: Important advice for farmers regarding crop damage due to heavy rains in Maharashtra Published on: 15 September 2022, 09:11 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters