1. कृषीपीडिया

नॅनो-फर्टिलायझर लिक्विड शेतकऱ्यांचे कष्ट आणि पैसा वाचवणार; जाणून घ्या वैशिष्ट्ये

शेतकरी आपल्या शेतीमध्ये चांगले उत्पादन घेण्यासाठी युरियाचा अतिवापर करतात. परंतु युरियाच्या आधिक वापरामुळे शेतजमिनीची सुपीकता कमी होते. मात्र या समस्येवर आता मात करता येणार आहे. यासाठी इफकोने नॅनो-फर्टिलायझर (Nano-fertilizer) लिक्विड तयार केले आहे.

रूपाली उत्तम कदम
रूपाली उत्तम कदम
Nano fertilizer liquid

Nano fertilizer liquid

शेतकरी आपल्या शेतीमध्ये चांगले उत्पादन घेण्यासाठी युरियाचा अतिवापर करतात. परंतु युरियाच्या आधिक वापरामुळे शेतजमिनीची सुपीकता कमी होते. मात्र या समस्येवर आता मात करता येणार आहे. यासाठी इफकोने नॅनो-फर्टिलायझर (Nano-fertilizer) लिक्विड तयार केले आहे.

नॅनो-फर्टिलायझर लिक्विडचा शेतकऱ्यांना चांगला फायदा होणार आहे. या नॅनो खताच्या सहाय्याने फक्त जमिनीची सुपीकताच नाही तर उत्पादनातही चांगली वाढ होणार आहे. शेतकर्‍यांचा पैसा, श्रम आणि वेळही वाचेल, असा दावा इफकोने केला आहे.

विशेष म्हणजे अर्धा लिटर नॅनो युरियाची (Nano urea) बॉटल ४५ किलो युरियाचे काम करेल. यामुळे शेतकऱ्यांच्या पैशांची बचत होणार आहे. नॅनो खताचे अनेक फायदे आहेत. मात्र यामधीलच सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे युरिया पिकाला फक्त ३० टक्के नफा देऊ शकतो आणि नॅनो युरिया ८० टक्के देईल.

शेतकऱ्यांनो कमी कालावधीत बक्कळ पैसा कमवायचा आहे? तर प्लायमाउथ रॉक कोंबडीचे पालन कराच...

महत्वाचे म्हणजे नॅनो खतांची फवारणी करण्यासाठी ड्रोनचाही (drone) वापर केला जाऊ शकतो. शेतकर्‍यांसाठी हे खत युरियापेक्षा स्वस्त असून ४५ किलो युरियाची पोती २६७ रुपयांना उपलब्ध आहे, तर तीच गरज पूर्ण करणारी द्रव नॅनो कंपोस्टची (Nano compost) अर्धा लिटर बाटली केवळ २४० रुपयांना उपलब्ध असेल.

आता तुमची पेन्शन तुम्हाला ठरवता येणार; एलआयसीची सरल पेन्शन योजना देतेय मोठी संधी

इफकोचे देशातील पहिले नॅनो-फर्टिलायझर (Nano-fertilizer) युनिट भारतातील गुजरात राज्यातील कलोल शहरात स्थापन केले आहे. विशेष म्हणजे येणाऱ्या 2023 या नवीन वर्षी नोव्हेंबर ते मार्च दरम्यान फुलपूरमध्ये ७० लाख बाटल्या खत निर्मितीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यामुळे भविष्यात देशात युरियाची टंचाई कधीच भासणार नसून शेतकऱ्यांसाठी फायद्याचे ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या 
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी 40 कोटींचा निधी मंजूर; येत्या 2 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होणार
शेतकऱ्यांनो घरबसल्या सुरू करा बटाटे आणि तांदळापासून 'हा' भन्नाट व्यवसाय; जाणून घ्या सविस्तर
'या' घरगुती उपायांनी दूर करा शरीरातील थकवा आणि अशक्तपणा; जाणून घ्या

English Summary: Nano fertilizer liquid save farmers labor money features Published on: 27 September 2022, 04:29 IST

Like this article?

Hey! I am रूपाली उत्तम कदम. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters