1. कृषीपीडिया

थोडं समजून घेऊ सेंद्रिय शेतीबद्दल

नुकतेच एका माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील ज्येष्ठ व्यक्तीशी गप्पा मारत होतो.

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
थोडं समजून घेऊ सेंद्रिय शेतीबद्दल

थोडं समजून घेऊ सेंद्रिय शेतीबद्दल

नुकतेच एका माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील ज्येष्ठ व्यक्तीशी गप्पा मारत होतो. सध्या माहिती तंत्रज्ञानाची फार चलती आहे. परंतु या तज्ञाच्या मते ही चलती आणखी फार तर दहा वर्षे आहे. अनेक व्यवसायांचे असेच होते. काही दिवस चलती असते आणि ती काही दिवसांनी कमी होते. मात्र त्यांच्या मते शेती हाच एकमेव असा व्यवसाय आहे की, ज्या व्यवसायाची चलती कधीच कमी होत नाही. माहिती

तंत्रज्ञानापेक्षा सुद्धा शेतीला अधिक चांगले भवितव्य आहे,Even more than technology, agriculture has a better future.असे त्यांचे ठाम मत होते. अनेक शेती तज्ञांंशी बोलून, स्वत: काही वाचून, अनुभवून आणि निरीक्षण करून मीही याच एका निष्कर्षाप्रत आलो आहे की, शेतीला चांगले भवितव्य आहे. शेतकरी सुद्धा तशी आशा बाळगून आहे. परंतु तो काहीसा निराश झालेला आहे. ही निराशा झटकून चांगली शेती करण्याची त्याची इच्छा सुद्धा आहे. तशी ती करायची झाली तर खालील पाच सूत्रे उपयोगी पडतील, असे वाटते.

 

१) रासायनिक खतांचा मर्यादित वापर करून सेंद्रीय खतांचा वापर वाढवणे. २) पावसाने कितीही हुलकावण्या दिल्या तरी जलसंधरणाच्या माध्यमातून त्यावर मात करणे. ३) महाराष्ट्र हे जगातले फलोत्पादनासाठीचे आदर्श राज्य आहे. तेव्हा महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकर्‍याने आपल्या शेताचा एक हिस्सा ङ्गळबागायतीखाली गुंतवणे. ४) हातात सातत्याने पैसा खेळत रहावा यासाठी आणि सेंद्रीय खतांसाठी जोडधंदा करणे. आणि ५) आपल्या शेतात तयार होणार्‍या मालावर शक्यतो कसली ना कसली प्रक्रिया करून नंतरच तो विकणे. आपण सुरूवातीला

सेंद्रीय शेती हा विषय समजून घेऊ या. आपण त्याची क्रमाक्रमाने माहिती घेणारच आहोत. परंतु ही सगळी चर्चा सुरू करण्याच्या आधी दोन-चार गोष्टींचा खुलासा होणे आवश्यक आहे. ङ्गार सुधारलेल्या आणि विचार करणार्‍या शेतकर्‍यांना काही शब्द आणि संकल्पना माहीत असतात. परंतु काही शेतकर्‍यांना काही शब्दांची मुळात कल्पनाच नसते. त्यामुळे शेतीवर चर्चा सुरू झाली की, सारी चर्चा डोक्यावरून जायला लागते. म्हणून काही शब्दांचे सोप्या भाषेत अर्थ सांगण्याचा प्रयत्न करीत आहे.

आपल्या शेतीच्या चर्चेमध्ये उत्पादन खर्च हा शब्द वारंवार येत असतो. उत्पादन खर्च म्हणजे आपण शेतामध्ये उत्पादन काढण्यासाठी जे पैसे खर्च करतो तो खर्च. उदा. आपण बी-बियाणावर खर्च करतो, गड्या माणसांच्या-बायकांच्या रोजगारावर खर्च करतो, खतांवर खर्च करतो, विजेचे बील भरतो हा सारा खर्च म्हणजे उत्पादन खर्च. सध्याच्या उद्योगांमध्ये उत्पादन खर्च या शब्दाला ङ्गार महत्व आलेले आहे. कारण उद्योग क्षेत्रात प्रचंड स्पर्धा निर्माण झालेली आहे. या स्पर्धेमध्ये उत्तम वस्तू

देण्याचा त्याच बरोबर ती वस्तू कमीत कमी किंमतीत देण्याचा प्रयत्न कारखानदार करीत आहेत. वस्तू तर उत्तम असली पाहिजे, पण तिची किंमत सुद्धा कमी असली पाहिजे. तरच स्पर्धेत माल टिकतो. मात्र कमीत कमी किंमतीत वस्तू विकली की नङ्गा कमी होतो. त्यासाठी सर्वात महत्वाचा उपाय म्हणजे उत्पादन खर्च कमी करणे आणि सध्याची उद्योग क्षेत्रातली लढाई ही उत्पादन खर्च कमी करण्याची लढाई आहे. शेतकर्‍यांनाही याचा विचार करावा लागणार आहे. बाजारात आपल्या शेतीमालाला

चांगला भाव मिळत नाही, अशी आपली तक्रार आहे. बाजारातले शेतीमालाचे भाव वाढले की, ग्राहक महागाई महागाई म्हणून ओरडायला लागतात आणि हे ग्राहक ओरडायला लागले की सरकार अस्वस्थ होते. कारण महागाई वाढली की, लोक त्यांना मते देत नाहीत. म्हणूनच मतांच्या स्वार्थासाठी सरकार शेतीमालाचे भाव वाढू नयेत, असा प्रयत्न करते.या सार्‍या भानगडीत आपल्या मालाला चांगला भाव मिळत नाही. मग जो काही भाव मिळेल तो परवडावा यासाठी आपल्याला आता शेतीमालाचा उत्पादन खर्च कमीत कमी कसा होईल, याकडे लक्ष द्यावे लागणार

आहे. उत्पादन खर्च कमी होऊन सुद्धा उत्पादन मात्र वाढले पाहिजे, याची आपल्याला काळजी घ्यावी लागणार आहे. शेतीमधले आपले नष्टचर्य संपविण्याची खरी सुरुवात याच ठिकाणी होणार आहे. शेतीमालाच्या उत्पादन खर्चांमध्ये रासायनिक खताचा मोठा हिस्सा असतो. त्यामुळे या रासायनिक खताला काहीतरी पर्याय शोधण्याची गरज आहे. परंतु त्याबाबत आपण ङ्गारसे गंभीर नाही. त्यामुळेच आपली शेती आपण वरचेवर रासायनिक खतावर अवलंबून ठेवायला लागलो आहोत.

एक तर हा खत महागही असतो आणि सध्या त्याचा काळाबाजार सुरू असल्यामुळे अवाच्या सवा पैसे घेऊन आपल्याला खत दिला जातो. त्याचा काळाबाजार होता कामा नये, असे सरकार म्हणते खरे. पण सरकारच्या या घोषणेची अंमलबजावणी होत नाही. शेतकरी मात्र वेड्यासारखे रासायनिक खताच्या मागे पळत असतात. खरे म्हणजे त्याची काही गरज नाही. या खतांना सेंद्रीय खत हा पर्याय आहे. त्यामुळे रासायनिक खतावरचा आपला खर्च कमी होणार आहे. म्हणजेच शेती व्यवसाय सुधारण्याची सुरुवात सेंद्रीय खताने होत असते.

अजूनही बरेच शेतकरी सेंद्रीय खत आणि त्यांचा वापर याबाबतीत पूर्णपणे अज्ञानी आहेत. सेंद्रीय खत म्हणजे काय, माहीतच नाही तर त्याच्या वापराचे महत्व त्यांना कसे कळणार ? म्हणून सोप्या शब्दात सेंद्रीय खत म्हणजे काय, हे थोडक्यात सांगत आहे. सेंद्रीयला इंग्रजीत ऑरगॅनिक असे म्हणतात. याचा अर्थ प्राणीज असा होतो. प्राणीज म्हणजे प्राण्यांपासून मिळालेले किंवा सजीवांपासून मिळालेले. आपण शेती करतो असे आपण म्हणत असतो आणि समजतही असतो. परंतु शेती हा

जैवतंत्रज्ञानावर आधारलेला व्यवसाय आहे. या व्यवसायात आणि शहरांमध्ये चालणार्‍या कारखान्यांमध्ये एक महत्वाचा बदल आहे. शहरातल्या कारखान्यांत अनेक प्रकारचे कच्चे माल एकत्रित करून एक वस्तू तयार केली जाते. एक मोटारसायकल तयार करताना अनेक प्रकारच्या वस्तू, काही यंत्रे एकत्रित केली जातात आणि त्या वस्तूंची ‘बेरीज’ होऊन मोटारसायकल तयार होते. या सगळ्या वस्तूंचा या कारखान्यात ‘गुणाकार’ होत नाही. परंतु शेतीमध्ये मात्र एका दाण्याचे अनेक दाणे तयार होतात. हे अनेक दाणे एका दाण्याला

चिटकवून पीक तयार होत नसते. त्या दाण्यांमध्ये निसर्गाने ठेवलेली पुनरुत्पादनाची नैसर्गिक शक्ती वापरून दाण्यांचा गुणाकार होत असतो.एका अर्थाने आपण जीवामध्ये लपलेल्या उत्पादन क्षमतेला चालना देत असतो आणि हे काम शेतातल्या मातीमध्ये दडलेले अनेक प्रकारचे जीवजंतू करत असतात आणि खर्‍या अर्थाने ते जीवजंतूच शेती करीत असतात. म्हणूनच शेतीला जैवतंत्रज्ञानावर आधारलेला उद्योग असे म्हटले जाते.शेतीचे महत्व कधीच कमी होणार नाही आणि शेतीला चांगले भवितव्य आहे, असे समजले जाते याचे कारण हे आहे. निसर्गाने प्रत्येक बियांमध्ये ठेवलेली विशिष्ट

पुनरुत्पादन शक्ती जोपर्यंत अस्तित्वात आहे तोपर्यंत आणि जोपर्यंत माणसाला आणि प्राण्यांना काहीतरी खाल्ल्याशिवाय जगता येत नाही तोपर्यंत शेतीचे महत्व टिकून राहणार आहे आणि या दोन गोष्टी शाश्‍वत आहेत. म्हणूनच शेती व्यवसायाला शाश्‍वत उद्योग म्हटले जाते. शेती व्यवसायामध्ये दडलेले हे तत्वज्ञान आपण लक्षात घेतले पाहिजे आणि आपले शेतीचे धोरण आणि नियोजन ठरवले पाहिजे. आपण शेतात कष्ट करतो. घाम गाळतो. ऊन, वारा, पाऊस यांची तमा न बाळगता परिश्रम करतो. तरी सुद्धा आपल्याला यश येत नाही, याचे कारण या तत्वज्ञानाचे विस्मरण हे आहे.

केवळ परिश्रम करून शेती यशस्वी होणार नाही. हाताने परिश्रम करण्याबरोबरच डोक्याने सुद्धा हा व्यवसाय केला पाहिजे. आपण केवळ मजूर नाही. आपण उत्पादक, व्यावसायिक आहोत. त्याचबरोबर आपण निसर्गाची किमया साकार करणारे कलाकार सुद्धा आहोत. म्हणून शेतीमध्ये एक आध्यात्मिक आनंद दडलेला असतो. जो केवळ हाताने काम करतो तो मजूर असतो. जो हात आणि डोके वापरून काम करतो तो कारागीर असतो आणि जो हात, डोके वापरून आणि अंत:करण ओतून काम करतो तो

खरा कलाकार असतो, कलावंत असतो. शेतकरी हा कलावंत असतो. तेव्हा शेती व्यवसायाशी असलेले निसर्गाचे नाते लक्षात घेऊन कलावंत होऊन शेती केली पाहिजे आणि हे नाते सांगणारी शेती म्हणजे सेंद्रीय शेती होत.शेतकऱ्यांना उपयुक्त शेती विषयक माहिती पुरवणे हा माझा उद्देश आहे त्याच उद्देशाने मी सेंद्रिय शेती हा मेन उद्दे डोळ्यासमोर ठेवून माझे काम चालू आहे विचारांची दिशा बदला जिवनाची दशा आपोआप बदलेल 

 

शरद केशवराव बोंडे

अमरावती

9404075628

bondes841@gmail.com

English Summary: Let's understand a little about organic farming Published on: 08 August 2022, 06:45 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters