1. कृषीपीडिया

आर्थिक स्वातंत्र्याचा 18जून हा काळा दिवस.

काँग्रेसच्या राज्यकर्त्यांनी 26 जानेवारी 1950 ला डॉ. आंबेडकरांची घटना मान्य केल्यावर,

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
आर्थिक स्वातंत्र्याचा 18जून हा काळा दिवस.

आर्थिक स्वातंत्र्याचा 18जून हा काळा दिवस.

काँग्रेसच्या राज्यकर्त्यांनी 26 जानेवारी 1950 ला डॉ. आंबेडकरांची घटना मान्य केल्यावर, तिथून काहीच महिन्यांनी नेहरुजी नी संविधानाचे अस्तित्वालाच गालबोट लावले. पहिली घटना दुरुस्ती करून 18 जून 1951 ला काळीमा फासला . फुगवलेल्या फुग्यातील हवा जशी काढून टाकावे तसेच घटनेतील हवाच काढून टाकली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेला मूळ विचार हा काँग्रेसने बाजूला केला. म्हणजेच काँग्रेस ही डॉ.आंबेडकरांच्या विचाराच्या त्याच दिवसापासून विरुद्ध गेली . घटना दुरुस्ती मध्ये परिशिष्ट 9 घालून, शेड्युल 31 वन, 31b चा अंतर्भाव करून, शेतकरी विरोधी कायदे करून शेतकऱ्यांच्या आत्महत्या घडविल्यात? म्हणूनच 18जून हा शेतकऱ्यांचा आत्महत्या दिवस .. डॉ.बाबासाहेब आंबेडकर व युगात्मा शरद जोशी हे महान अर्थशास्त्रज्ञ,समाज शास्त्रज्ञ होते. जरी शरद जोशी हे जातीने ब्राह्मण होते म्हणून यांनीच अप प्रचार केला,तरीपण एका ब्राह्मणाने शेतकऱ्यांना मातीतून वर काढले, अडाणी शेतकऱ्याला बोधामृत पाजले . मराठ्यां च्या नेत्यांनी सतत 40 वर्ष सत्ता भोगू न शेतकऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसला. त्यांनी हे अघोरी कायदे बदलविले नाही. हे नेते जातीच्या नावावर सत्तेत राहून आता मरायला टेकले, तरीपण त्यांचे सत्तेतून मन निघाले नाही, आता दुसरा जन्म घेऊन ये कायदे बदलविणार आहेत काय? व यांनी शेतकरी, मजुरांची गरिबी सुध्धा आज पर्यंत हटविली नाही. गरिबी चा नारा देऊन, गरिबी हटत नाही, तर त्यासाठी कायद्याची तरतूद करावी लागते. आर्थिक नियोजन करावे लागते. म्हणूनच शेतकरी संघटना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर पूर्णपणे आजही कार्यरत आहे व पुढेही राहील.

 डॉ. आंबेडकर म्हणायचे शेतकरी ,शेतमुजरासाठी काँग्रेस हे जळते घर आहे. तेव्हा आमच्या लक्षात आले नव्हते, पण आज ही वस्तुस्थितीच डोळ्या समोर दिसत आहे?.       

 

हे ही वाचा   मधमाश्या नष्ट झाल्या कि चार वर्षात मानव नष्ट होईल - थोर शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईन

 

 शेतकऱ्यावर होणारा गोळीबार ,अत्याचार, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या गेल्या,जो अमानुष हिंसाचार झाला.ते याच कायद्याने केला. शेतकरी कंगाल करून भिकारी या कायद्यामुळे झाला . जगाचा पोशिंद्यावर राज्यकर्त्यांनी व सत्ताधीशांनी जो,घनघोर लाथाबुक्क्यांनी अन्याय केला तो शेतकऱ्यांना संपवणारा कायदा तो हाच होय. एवढा अनर्थ या कायद्याने केला.शेतकऱ्यांच्या शेती मालाच्या भावावर गदा आणून जीवनावश्यक वस्तू कायदा सन 1955 मध्ये काढला. शेतीमालाला भाव मागने हा या देशातआता गुन्हा आहे?.तुम्ही शेतमाल पिकवा, उत्पादन वाढवा, पण त्या पिकवलेल्या मालाला भाव मागू नका. भाव मागितला तर गाठ आमच्याशी आहे. हा राक्षसी अवतार तुमच्या छातीवर बसलेला आहे. कारण तुम्हाला उपाशी राहूनच, शहरातील लोकांना पोटभर जेवू घालायचे आहे? मग शहरातल्या लोकांना जेवू घालण्यासाठी फक्त शेती करायची होती का? आता ही लढाई आपल्याला स्वकीयांन सोबतच लढावी लागेल. आपणच निवडून पाठविलेले आमदार खासदारांकडून हे कायदे रद्द करून घ्यावे लागेलं. म्हणजेच आपलेच वैर आपल्याशी. अशी वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. 

कारण हे कायदे जनता रद्द करू शकत नाही. त्यासाठी आमदार-खासदारांचा बहुमताचा निर्णय संसद मध्ये होणे गरजेचे आहे. शरद जोशी म्हणायचे गोरे इंग्रज गेले, काळे इंग्रज तयार झाले. तरी सर्व शेतकरी बंधूंना जाहीर विनंती,. पुढील महिन्यात येणाऱ्या 18 जूनला, आपल्या घरावर काळे झेंडे बांधून निषेध व्यक्त करावा. स्वतःच्या मोटरसायकलवर काळे झेंडे बांधून फिरावे.व सर्व शेतकऱ्यांनी काली फिती लावून हा काळा दिवस पाळावा. अशा पद्धतीने शासनाचा निषेध अहिंसेच्या मार्गानेच करावयाचा आहे. आता रस्त्यावरची आंदोलने, व रस्त्यावरची लढाई हीआता संपलेली आहे.

             जे शेतकरी आपल्या घरावर काळे झेंडे बांधणार नाहीत. त्यांना शेतकऱ्यां प्रति संवेदना नाही असाच याचा अर्थ होतो. ते राजकीय पक्षाचे गुलाम, लाचार ,व दलाल आहेत हेच त्यातून जाहीर होईल. व शेतकऱ्यां प्रति नौटंकी करणारे शेतकरी नेत्यांन कडून हे कायदे रद्द करून घ्यावे लागतील, नाही तर आता यांना पुढील कार्यक्रमात स्टेजवरून झोडपे लाऊनच हाकलून द्यावे लागेल. आता हा अन्याय किती वर्ष सहन करावा? शेतीमाल बाहेर परदेशातून आयात करून या देशातील शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे भाव पाडायचे हे कटकारस्थान आता हाणून पाडाव लागेल. शासन हे शेतकऱ्यांना जगू देत नाही, आणि मरू पण देत नाही, अशा बिकट अवस्थेत आतापर्यंत वागवत आले आहे. गेल्या ६0 वर्षांपासून याला काँग्रेस व तिला सहकार्य करणारे इतर छोटी राजकीय पक्ष हे सुद्धा जबाबदार आहे . सत्तेतील सर्वच राजकीय पक्ष याला जबाबदार आहे. अजून तुम्हाला,सर्वांना, 

गेल्या ७0 वर्षांपासून चा होणारा अन्याय, जर कळत नसेल, व आयुष्यभर राजकीय दलालाच्या मागेच लाचार,गुलाम म्हणून फिरायचे असेल, तर शेतकरी संघटनेचा नाईलाज आहे. ज्या शेतकऱ्यांचे पोट फक्त शेतीवर आहे , संपूर्ण प्रपंचाचा कारभार शेतीवर आहे त्या नाच या परिस्थितीची जाणीव आहे. काही शहरी शेतकरी यांचे जगण्याचे मार्ग वेगवेगळे आहेत, यांचे नोकरी,व्यवसाय वेगवेगळे आहे, त्यांचे पोट शेतीचे उत्पन्नावर नाही. म्हणून ते कदाचित काही अंशी विरोध सुद्धा करतील. असे हे क्रुर शेतकरीच आपल्या गावातील शेतकरी भावाला घेऊन डुबवणार आहे. शासन व्यवस्था व काही राजकीय शेतकरी याला जबाबदार राहणार आहे. शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते ही लढाई शासनासोबत गेल्या 40 वर्षांपासून विरोधी भूमिका घेऊन लढत आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा कलंक पुसण्यासाठी,शेतकऱ्यांचे कैवारी रघुनाथ दादा पाटील, कालिदास aapet, धनंजय काकडे पाटील, एडवोकेट सुभाष जी खंडागळे, किसान पुत्र आंदोलनाचे नेते अमर हबीब साहेब, व इतर शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते एकदिलाने लढत आहे. या देशातील नागरिक म्हणून ही आर्थिक स्वातंत्र्याची लढाई तुम्हाला, आम्हाला, सर्वांना एकदा पुन्हा लढावीच लागेल. संपूर्ण शेतकरी जर एक दिलाने ही लढाई लढले तर ,आर्थिक स्वातंत्र्याचा दिवस हा जास्त दूर राहणार नाही. तरी आपण शोषित शेतकऱ्यांचे शत्रू होऊ नये. एवढीच जाहीर विनंती. (परिपत्रक शेतकरी संघटना)

 शरद जोशी म्हणायचे- शेतकरी तितुका एक ही एक.

.जय बळीराजा . जय शेतकरी संघटना. 

 

 आपला नम्र-  

धनंजय पाटील,काकडे                           

 विदर्भ प्रमुख ,शेतकरी संघटना. 

9356783415.

English Summary: June 18 is a black day of financial freedom. Published on: 26 April 2022, 03:27 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters