1. कृषीपीडिया

पपई शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनो जाणुन घ्या पपईच्या या जाती या जाती देतील बम्पर उत्पादन

पपईचे पिक हे जवळपास 10 ते 13 महिन्यात तयार होते पपईची लागवड जुलै ते सप्टेंबर किंवा फेब्रुवारी ते मार्च मध्ये केली जाते. अलीकडील काही वर्षात शेतकऱ्यांचा पपई लागवडीकडे कल वाढत जात आहे अशातच या पपईच्या जाती पपई चे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी खुपच फायदेशीर ठरतील अशी आशा व्यक्त केली जात आहे.

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
papaya

papaya

पपईचे पिक हे जवळपास 10 ते 13 महिन्यात तयार होते पपईची लागवड जुलै ते सप्टेंबर किंवा फेब्रुवारी ते मार्च मध्ये केली जाते. अलीकडील काही वर्षात शेतकऱ्यांचा पपई लागवडीकडे कल वाढत जात आहे अशातच या पपईच्या जाती पपई चे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी खुपच फायदेशीर ठरतील अशी आशा व्यक्त केली जात आहे.

 

जाणुन घेऊया पपईचे फायदे (benifits of papaya)

  • पपईमध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. पपईमध्ये फायबर देखील चांगल्या प्रमाणात असतात, ज्यामुळे ते कोलेस्टेरॉल नियंत्रित करण्यासाठी खूप प्रभावी आहे.
  • जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर पपईचा तुमच्या आहारात समावेश करा. पपईमध्ये असलेले फायबर वजन कमी करण्यासाठी उपयुक्त असतात.
  • पपईमध्ये रोग प्रतिकारशक्ती वाढवण्याची प्रचंड क्षमता असते. पपई शरीरासाठी आवश्यक व्हिटॅमिन सी ची पूर्तता करण्यास सक्षम आहे. जर तुम्ही नियमित पपईचे सेवन केले तर आजारी पडण्याची शक्यता बरीच कमी होईल.
  • जर तुम्ही पपईचे नियमित सेवन केले तर तुमची दृष्टी वाढेल, कारण त्यात व्हिटॅमिन ए मुबलक प्रमाणात आढळते.
  • ज्या स्त्रियाना मासिक पाळीच्या दरम्यान वेदना होतात, त्यांनी पपईचे सेवन करावे. यामुळे, मासिक पाळी नियमित राहते, आणि मासिक पाळी दरम्यान वेदना कमी होतात.

 

 

 

जाणुन घ्या पपई शेतीसंबंधी ह्या महत्वाच्या बाबी ( important things about Papaya cultivation)

सप्टेंबर महिना हा पपईची शेती सुरू करण्यासाठी सर्वोत्तम काळ असल्याचे मानले जाते ही बियाणे पेरण्याची योग्य वेळ आहे.  अशा स्थितीत जर शेतकरी सुरुवातीपासून योग्य बियाणे निवडून शेती करतील तर उत्पन्न वाढेल व परिणामी नफा वाढवू शकतात. भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR) व भारतीय फलोत्पादन संशोधन संस्था बंगळुरू देखील पपईच्या सर्वोत्तम जातींबद्दल सांगत राहते. शेतकरी त्यांच्या सोयीनुसार तिथून बियाणे देखील निवडू शकतात.

 

पपई पिकाचे बियाणे, जे सुमारे 10 ते 13 महिन्यांत तयार होते, जुलै ते सप्टेंबर किंवा फेब्रुवारी-मार्च दरम्यान लावले जाते. गेल्या काही वर्षांमध्ये पपई लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे, उत्पन्न वाढवण्याचा हा एक चांगला मार्ग ठरत आहे. पपई शेतीत योग्य जात निवडून नफा आणखी वाढवता येतो. म्हणुनच आज आपण पपईच्या सर्वोत्तम जाती कोणत्या आहेत आणि त्यांची खासियत काय आहे ते जाणुन घेऊया.

 

पपईच्या काही प्रसिद्ध जाती (Best Papaya Breeds)

 

अर्का प्रभात

अर्का प्रभात पपईच्या उत्कृष्ट जातींपैकी एक आहे. हे उभयलिंगी प्रकाराची वाण आहे.  फळाची लांबी लहान (60-70 सेमी) असते.  पण तेव्हाच ते फळ देण्यास सुरुवात करते. हे उभयलिंगी आहे, म्हणून याचे बियाणेच उत्पादन घेणे सोपे आहे. या जातीच्या फळाचे सरासरी वजन 900-1200 ग्रॅम पर्यंत असते आणि गुणवत्ता देखील चांगली असते.

 

 

अर्का सूर्य

ही जात देखील उभयलिंगी आहे. ह्या जातीच्या फळाची त्वचा मऊ असते, पिकल्यानंतर फळाचा रंग एकसारखा पिवळा होतो. ह्या जातीच्या फळाचा आकार मध्यम असतो आणि वजन सुमारे 600 ते 800 ग्रॅम असते, ह्या जातीच्या फळाच्या आतील भागात लहान  पोकळी असते. ह्या फळांचा टिकाऊपणा आणि गुणवत्ता चांगली असते. प्रति झाड उत्पादन सुमारे 55 ते 65 किलो (60 ते 65 टन प्रति एकर) आहे.

 

 

 

 

रेड लेडी

पपईची ही सर्वात लोकप्रिय वाण आहे.  ह्या जातीच्या फळाचे वजन 1.5-2 किलो पर्यंत असते आणि फळांची चव लोकांना खूप आवडते.

 

 

 

 

वॉशिंग्टन

पपईची ही वाण शेतकऱ्यांमध्ये खूप लोकप्रिय आहे. फळाचे वजन 1-1.5 किलो असते आणि रंग गडद पिवळा असतो. एका झाडापासून किमान 60 किलो फळ मिळू शकतात.

 

 

 

 

 

कूर्ग हनीड्यू

ह्या जातीची झाडे बुटकी असतात. फळाचे सरासरी वजन 1.5-2.0 किलो असते फळे लांब आणि अंडाकृती असतात पिकल्यावर फळांचा रंग पिवळा होतो ह्या जातींचे प्रति झाड उत्पादन सुमारे 70 किलो आहे.

 

 

 

 

 

पुसा जायंट

ह्या जातीची खोड खूप मजबूत असतात.  गडगडाटी वादळे सहन करण्यास सक्षम असतात. फळे मोठ्या आकाराची असतात ज्यांचे सरासरी वजन 2.5 ते 3.0 किलो असते.  प्रति झाड सरासरी उत्पादन 30 ते 35 किलो पर्यंत असते. ह्या जातींचा फळांचा बहुतेक वापर पेठा आणि भाजी बनवण्यासाठी केला जातो.

 

 

 

पुसा डेलीसिएस

ह्या जातीची झाडे फार मोठी होत नाहीत पण भरपूर फळे देतात. सरासरी उत्पन्न प्रति झाड 58 ते 61 किलो असते आणि फळाचे सरासरी वजन 1.0 ते 2.0 किलो असते.

 

 

 

 

 

पुसा ड्वार्फ

या प्रजातीची झाडे नावाप्रमाणेच लहान बुटकी असतात. ह्या जातीची फळे अंडाकृती असतात, त्यांचे वजन 1.0 ते 2.0 किलो असते. प्रति झाड 40 ते 50 किलो उत्पन्न मिळते.  जास्तीच्या लागवंडीसाठी सर्वोत्तम वाण.

 

English Summary: important veriaty of papaya Published on: 03 September 2021, 01:16 IST

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters