1. कृषीपीडिया

जमिनीसाठी उपयुक्त आहेत हिरवळीचे खते; जाणून घेऊ हिरवळीच्या खतांसाठी उपयुक्त पिके

हिरवळीचे खते जमिनीत सेंद्रिय पदार्थांचा पुरवठा करतात. जमिनीचे भौतिक,रासायनिक व जैविक गुणधर्म सुधारतात. तसेच जमिनीची पाणी धारण करण्याची क्षमता वाढते.याचा पीक उत्पादन वाढीसाठी फायदा होतो. ताग,धैचा, उडीद,मुग, चवळी, गवार इत्यादी द्विदल पिके शेतात वाढवून फुलोऱ्यावर येण्यापूर्वी नांगरून जमिनीत गाडावीत. या लेखात आपण ताग आणि धैंचा या हिरवळीच्या खतासाठी उपयुक्त पिकांची माहिती घेणार आहोत.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
greenary fertilizer

greenary fertilizer

 हिरवळीचे खते जमिनीत सेंद्रिय पदार्थांचा पुरवठा करतात. जमिनीचे भौतिक,रासायनिक व जैविक गुणधर्म सुधारतात. तसेच जमिनीची पाणी धारण करण्याची क्षमता वाढते.याचा पीक उत्पादनवाढीसाठी फायदा होतो. ताग,धैचा,  उडीद,मुग, चवळी, गवार इत्यादी द्विदल पिके शेतात वाढवून फुलोऱ्यावर येण्यापूर्वी नांगरून जमिनीत गाडावीत. या लेखात आपण ताग आणि धैंचा या हिरवळीच्या खतासाठी उपयुक्त पिकांची माहिती घेणार आहोत.

ताग

  • हेपिक शेंगवर्गीय द्विदल वर्गातील असल्यामुळे या पिकाच्या मुळांच्या गाठीवर नत्र शोषण करणाऱ्या जिवाणूच्या गाठी असतात.
  • झाडाला चमकदार,लुसलुशीत, गर्द हिरव्या रंगाचे लांबुळकी आकाराची भरपूर पाणी असतात व फुले पिवळ्या रंगाची असतात.
  • एक जमिनीत गाडल्यानंतर कुजून हेक्‍टरी 50 ते 60 किलो नत्र स्थिरीकरण होते. सेंद्रिय पदार्थांत 0.8टक्के नत्र, एक टक्के स्फुरद व5 टक्के पालाश असते.

ताग पिकाचे लागवड तंत्र

  • ताग पिक निचरा होणारी हलक्‍या ते भारी सर्व प्रकारच्या जमिनीत घेता येते.पाणथळ जमिनीत बिजोत्पादन घेऊ नये. त्याची पेरणी पाऊस पडल्यावर ताबडतोब करावी. लागवडीसाठी के-1, डी-11, एम-19, नालंदा या जातींची निवड करावी. पेरणी करताना दोन ओळींतील अंतर तीस सेंटिमीटर ठेवून करावी.पेरणीसाठी हेक्‍टरी 25 ते 40 किलो बियाणे वापरावे.फोकून पेरणीकरताना एकरी 55 ते 60 किलो बियाणे लागते.
  • पेरणीपूर्वी 15 किलो बियाण्यास 250 ग्रॅम रायझोबियम जिवाणू संवर्धकाची बीजप्रक्रिया करावी. सेंद्रिय शेती पद्धतीत कोणत्याही प्रकारचे रासायनिक खत वापरू नये.
  • आंतर मशागत करण्याची आवश्यकता नाही. पेरणीपासून 40 ते 50 दिवसांनी पीक फुलांवर येण्यास सुरुवात झाल्यानंतर नांगराच्या साहाय्याने जमिनीत गाडावे.त्यामुळे जमिनीत 80 ते 120 किलो नत्रप्रति हेक्‍टरी साठवले जाते.

धैचा

  • हे द्विदलवर्गीय पीकआहे. याच्या मुळावर, खोडावर व फांद्यांवर जिवाणूंच्या गाठी असतात.त्या हवेतील नत्राचे स्थिरीकरण करतात. हे पीक तागाच्या तुलनेत विविध प्रकारच्या जमिनीत घेता येते.
  • याची लागवड भातशेती किंवा उसात आंतरपीक म्हणून केली जाते.हे पीक पाणथळ, शार युक्त तसेच चोपण व आम्ल आयुक्त हलक्या किंवा भारी अशा विविध प्रकारच्या जमिनीत घेता येते.

लागवड तंत्र

  • खोल नांगरट करून वखराच्या पाळ्या देऊनजमीन भुसभुशीत करावी. चांगला पाऊस पडल्यावर पेरणी करावी. लागवडीसाठी स्थानिक जात किंवा टी एस आर-1या जातीची निवड करावी.
  • सरत्याने पेरणी करताना त्यात माती किंवा बारीक रेती मिसळावे. पेरणी करताना दोन ओळींमधील अंतर 30 सेंटिमीटर ठेवावे.हेक्‍टरी 25 ते 30 किलो बियाणे लागते. पेरणीपूर्वी 15 किलो बियाण्यास 250 ग्रॅम रायझोबियम जिवाणू संवर्धकाची बीजप्रक्रिया करावी.
  • सेंद्रिय पद्धतीमध्ये रासायनिक खतांचा वापर व आंतरमशागत करू नये.
  • पेरणीनंतर 40 ते 45 दिवसात पिकाची 100 ते 125 सेंटिमीटर उंच वाढ होते. या अवस्थेत ट्रॅक्‍टरचलित नांगराच्या साहाय्याने जमिनीत गाडावे.  त्यामुळे जमिनीत 70 ते 100 किलो नत्र प्रति हेक्‍टरी नत्र साठवले जाते.

हिरवळीच्या खताचे फायदे

  • जमिनीतील सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण आणि सूक्ष्मजीवांच्या क्रियांचे गती वाढते.
  • पाणी मुरण्याचे प्रमाण वाढते. जमिनीची धूप कमी होते व जलधारण क्षमता वाढते.
  • मातीच्या रचनेत बदल होतात.
  • शेंगवर्गीय पीक हिरवळीच्या खतासाठी घेतल्याने जास्तीचे नत्र जमिनीत स्थिर होते त्यामुळे पुढील पिकास नत्राची मात्रा कमी प्रमाणात लागते.
  • हिरवळीची खते जमिनीत खालच्या थरात निघून जाणाऱ्या अन्नद्रव्यांना धरून ठेवण्यास मदत करतात. हिरवळीची पिके जमिनीतील खालच्या थरातील अन्नद्रव्य वरच्या थरात आणतात.
  • हिरवळीचे खत नत्रासोबत स्फुरद,पालाश, कॅल्शियम, मॅग्नेशियम वलोहाची उपलब्धता वाढते.
English Summary: greenary fertilizer is important for land and some crop is useful for gerrnary fertilizer Published on: 18 October 2021, 02:34 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters