1. कृषीपीडिया

Farming Business Idea: कसावा पिकापासून बनवला जातो साबुदाणा! याची लागवड करा, लाखोंची कमाई होणारं

Farming Business Idea: आपल्या भारत देशात शेतीतून (Farming) चांगले उत्पन्न (Farmer income) मिळविण्यासाठी शेतकरी आणि शास्त्रज्ञांकडून अनेक यशस्वी प्रयत्न केले जात आहेत. आता शेतकरी (Farmer) चांगल्या उत्पादनासाठी प्रगत तंत्र आणि सुधारित वाणांवर काम करत आहेत.

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
cassava crop cultivation information

cassava crop cultivation information

Farming Business Idea: आपल्या भारत देशात शेतीतून (Farming) चांगले उत्पन्न (Farmer income) मिळविण्यासाठी शेतकरी आणि शास्त्रज्ञांकडून अनेक यशस्वी प्रयत्न केले जात आहेत. आता शेतकरी (Farmer) चांगल्या उत्पादनासाठी प्रगत तंत्र आणि सुधारित वाणांवर काम करत आहेत. पारंपारिक पिकांना (Traditional crops) खूप महत्त्व असले तरी बागायती पिके देखील शेतकऱ्यांना चांगला नफा देत आहेत.

या बागायती पिकांमध्ये कसावाचा (Cassava crop) समावेश होतो. साबुदाणा बनवण्यासाठी कसावा वापरला जातो हे फार कमी लोकांना माहिती आहे. उत्तर भारतात कसावा फार्मिंग (Cassava farming) करून शेतकरी करून चांगले उत्पन्न मिळवत आहेत.

कसावा काय आहे बर…!

कसावा हे कंदयुक्त पीक आहे ज्याच्या मुळांमध्ये भरपूर स्टार्च असते. कसावाचा पोत रताळ्यासारखा असतो, पण त्याची लांबी जास्त असते. जमिनीत उगवणाऱ्या या पिकातून भरपूर स्टार्च मिळतो, ज्यापासून साबुदाणा तयार करण्यासाठी लगदा तयार केला जातो.

तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि केरळमध्ये याची लागवड केली जाते. कमी पाण्यात आणि सुपीक माती नसतानाही कसावाचे चांगले उत्पादन घेऊ शकते. साबुदाण्याव्यतिरिक्त कसावा हा उत्तम पशुखाद्य म्हणूनही ओळखला जातो. याच्या सेवनाने जनावरांचे आरोग्य सुधारते आणि दुधाचे प्रमाणही वाढते.

अशा प्रकारे शेती केली जाते बर…!

कंद पिकांप्रमाणेच कसावाची देखील मुळांची पुनर्लावणी करून लागवड केली जाते. सर्व प्रकारच्या हवामानात आणि जमिनीत याची लागवड करता येते, परंतु डिसेंबर महिन्यात त्याचे कंद वेगाने फुटतात. सपाट ते उताराच्या ठिकाणी लागवड करणे खूप सोपे आहे, परंतु शेतात पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था असावी.

या सुधारित जाती आहेत बर…!

कसावा लागवड करण्यापूर्वी, फक्त त्याच्या सुधारित जाती निवडा. भारतात श्री सह्या व्यतिरिक्त श्री प्रकाश, श्री हर्षा, श्री जया, श्री रक्षा, श्री विजया संकरीत कसावा, श्री विशाखम, H-97, H-165, H226 इत्यादी देखील शेतकऱ्यांमध्ये खूप प्रसिद्ध आहेत. साबुदाणा उद्योगाच्या दृष्टीने अनेक शेतकरी कसावाची व्यावसायिक लागवडही करतात.

कसावा कुठे विकायचा बर…!

भारतात, अनेक भागात उपवास आणि साबुदाणा मोठ्या प्रमाणात वापरला जातो, त्यामुळे कसावा शेती कधीही अपयशी ठरत नाही, उलट बटाट्यापेक्षा जास्त उत्पादन देते. दक्षिण भारतात हे गहू आणि धान या नगदी पिकांच्या यादीत गणले जाते, त्यामुळे लागवड करण्यापूर्वी बाजारपेठेची माहिती असणे आवश्यक आहे.

तसे, अनेक कंपन्या कसावाची कंत्राटी शेती करतात, ज्यात सामील होऊन तुम्ही चांगला नफा कमवू शकता. याशिवाय अनेक शेतकरी कसावाची व्यावसायिक शेती करून इतर देशांसाठी कसावा तयार करतात.

English Summary: farming business idea cassava farming information Published on: 18 August 2022, 07:39 IST

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters