1. कृषीपीडिया

शेतकऱ्यांची चिंता मिटली; मोबाईलवरून शेतमाल विका आणि जागेवरती मिळवा पैसे, जाणून घ्या कसे

आता शेतकऱ्यांची चिंता मिटली आहे. आता मोबाईलवरून शेतमालाची विक्री करत येणार आहे. आणि शेतातच पैसे मिळणार आहेत. शेतकरी बांधवांनासाठी अ‍ॅग्रीहाईक स्टार्टअप कंपनी ही सेवा देत आहे.

पाराजी आबासाहेब शिंदे
पाराजी आबासाहेब शिंदे
Agri Hike App

Agri Hike App

आता शेतकऱ्यांची चिंता मिटली आहे. आता मोबाईलवरून शेतमालाची विक्री करत येणार आहे. आणि शेतातच पैसे मिळणार आहेत. शेतकरी बांधवांनासाठी अ‍ॅग्रीहाईक स्टार्टअप कंपनी ही सेवा देत आहे. अ‍ॅग्रीहाईक स्टार्टअप कंपनीस एप्रिल २०१८ ला सुरुवात केली आहे. कंपनी शेतकरी बांधवांना वेबसाईट व फोन नंबरच्या माध्यमातून आपल्या सेवा देत आहे.

आपल्या सेवा जलद आणि सुलभ होण्यासाठी अ‍ॅग्रीहाईक मोबाइल अ‍ॅप विकसित करून शेतकरी बांधवांना थेट निर्यातदार तसेच बिग बझार, बिग बास्केट, रिलायन्स फ्रेश मार्ट यासारख्या मोठ्या रिटेल चेन्स बरोबर जोडून शेतकऱ्यांचा आर्थिक नफा वाढवला आहे.

ऊस, द्राक्षे, डाळींब, केळी, हळद, विविध भाज्या इ. पिकांचे उत्पादन घेतले जाते. शेतकरीबांधव हे कष्टाळू आहेत आणि शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करून नेहमीच शेतीतून जादा उत्पादनाकडे त्यांचा कल असतो. परंतु विविध बाजारपेठेबद्दल माहिती, शेतमाल वाहतूक खर्च, विक्री कौशल्यचा अभाव , व्यापारी वर्गाकडुन फसवणूक आदि कारणामुळे शेतकरी बांधवांचे आर्थिक नुकसान होत आहे.

ही समस्या सोडवण्यासाठी सांगली जिल्ह्यातील उच्चशिक्षित सुरजित पाटील आणि तरुण मित्रांनी एकत्र येऊन ही कंपनी सुरु केली आहे. आयआयटी मधून शेती तंत्रज्ञानविषयचे उच्च शिक्षण घेतलेल्या, शेतीविषयी आपुलकी, प्रेम व जिव्हाळा असलेल्या तरुणांनी आपल्या शेतकरी राजाला असलेल्या समस्येवर शाश्वत उपाय काढण्यासाठी कंपनीची स्थापना केली

अ‍ॅग्रीहाईकची ठळक वैशिष्ट्ये

१) शेतकरी आणि मोठे खरेदीदार यांना ऑनलाईन मोबाईल अ‍ॅप सेवा
२) शेतकरी बांधवांना उत्पादित शेतमालास उत्तम आणि वेळेवर मोबदला
३) शेतमाल उत्पादनाचे पूर्णपणे ऑनलाईन ट्रॅकींग सुविधा व पारदर्शक व्यवहार
४) शेतकऱ्यांना मोठ्या संस्थातमक खरेदीदारांच्या नेटवर्कशी थेट जोडते
५) शेतमाल थेट खरेदीदार विक्रीमुळे शेतकऱ्यांना जादा नफा
६) द्राक्ष तोडणी, प्रतवारी, पॅकेजिंगसाठी १००+ कुशल कृषि सहाय्यक टीम मदतीस सोबत
७) द्राक्षमाल ताजा आणि त्याची गुणवत्ता राखण्यासाठी कोल्डस्टोरेज व कोल्ड लॉजिस्स्टिक कंपनीसोबत करार
८) ३०००+ शेतकरी तसेच २००+ मोठे खरेदीदार यांची खरेदी - विक्री साठी नोंदणी
९) ७५००+ टन ताजी फळे व भाजीपाला विक्री
१०) शेतकरी देशी तूप, गुळ, बेदाणा अशा मूल्यवर्धित उत्पादने अ‍ॅग्रीहाईकच्या अ‍ॅग्रीमार्ट ऑनलाईन व्यासपीठावरुन विक्री
११) चालू हंगामात ₹२५ कोटींहून अधिक व्यापार मूल्य असलेल्या शेतमाल विक्रीसाठी मोबाइल अ‍ॅपवर नोंदणी
१२) जगातील सर्वोत्तम इलेक्ट्रोस्टॅटिक फवारणी प्रणाली ( E.S.S.) मशीन शेतकऱ्यांना द्राक्ष व डाळींब फळबाग फवारणीसाठी भाडेतत्त्वावर उपलब्ध
१३) भारतातील प्रथम कृषी पार्श्वभूमी असलेल्या तरुण -तरुणीसाठी फ्रीलान्सिंग प्लॅटफॉर्म व कृषी कॉर्पोरेटसाठी आउटसोर्सिंग पर्याय

अ‍ॅग्रीहाईक मोबाईल अँप फायदे

1. मोफत नोंदणी (कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही)

2. घरबसल्या ताजी फळे भाजीपाला,धान्ये आणि प्रक्रियायुक्त उत्पादने यांची विक्री करता येणार

3. शेतकरी ठरवणार शेतमालाचा दर

4. खरेदीदार शेतमाल खरेदीसाठी तुमच्या दारात येणार

5. जागेवर पेमेंट किंवा बँकेत जमा सुविधा

6. हवामान अंदाज, बाजारभाव व कृषी वार्ता माहिती सुविधा

7. शेतीसंबंधी विविध विषयांवर तंज्ञासोबत चर्चासत्रे व मार्गदर्शन

8. शेतकरी शेत शिवार भेट

9. विविध शासकीय योजनांची माहिती

शेतमाल विक्री प्रक्रिया अगदी सोपी

1.शेतकरी पोस्ट इमेज

2. अ‍ॅग्रीहाईक टिम पाहणी

3. खरेदीदारस अहवाल पाठवले जातात

4. शेतकरी आणि खरेदीदार भेट व बोलणी

5. शेतमाल विक्री नंतर शेतकऱ्याच्या हातात लगेच पैसे

अ‍ॅग्रीहाईक मोबाईल अँप डाऊनलोड करण्यासाठी Link

https://play.google.com/store/apps/details?id=com.agrihike&hl=en

अ‍ॅग्रीहाईक स्टार्टअप कंपनीच्या सेवा

कंपनी शेतकऱ्यांकडून कोणते व अपेक्षित उत्पादन, शेतमाल तोडणी दिवस व दर ,फळाची जात आदी माहिती घेते.छोटे व मध्यम क्षेत्र असलेल्या शेतकरी बांधवांना शेतमाल खरेदीदारांचे विविध पर्याय उपलब्ध करून देते. अ‍ॅग्रीहाईकडून सर्व खरेदीदार , रिटेल चेन्सची KYC व्हेरीफिकेशनकरून नोंदणी.

याचबरोबर शेतकरी बांधवांना हवामान अंदाज, फळबागेसाठी आधुनिक तंत्रज्ञान माहिती, शेती पिकासाठी मार्गदर्शन व सल्ला, शेतकरी उत्पादक कंपनी स्थापनेविषयी असंख्य प्रतिष्ठित कन्सल्टंटसद्वारे मार्गदर्शन करत आहे.

English Summary: Farmers' worries allayed; Learn how to sell commodities on mobile Published on: 05 February 2022, 11:10 IST

Like this article?

Hey! I am पाराजी आबासाहेब शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters