1. कृषीपीडिया

माहिती खतांच्या बाबतीत! शेतकरी राजांनो, वापरा 'या'सोप्या पद्धती आणि ओळखा Urea आणि DAP असली आहे या नकली

खरीप पिकांचा पेरणीचा हंगाम सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पिकांसाठी खतांची मोठ्या प्रमाणात गरज असते. अनेकदा बरेच शेतकरी विनापरवाना दुकानातून किंवा गावात फिरून खते विकतात अशांकडून खतांची खरेदी करतात आणि शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होते.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
farmers use this small and important tricks and know about urea real or fake

farmers use this small and important tricks and know about urea real or fake

 खरीप पिकांचा पेरणीचा हंगाम सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पिकांसाठी खतांची मोठ्या प्रमाणात गरज असते. अनेकदा बरेच शेतकरी विनापरवाना दुकानातून किंवा  गावात फिरून खते विकतात अशांकडून खतांची खरेदी करतात आणि शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होते.

अशा फसवणुकीचे प्रकरणे टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी स्वतः खते आणि खताची ओळख पटवायला शिकले पाहिजे. जेणेकरून शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टळेल.

पाण्यात विरघळणाऱ्या खतांच्या स्थितीनुसार योग्य आणि अयोग्य खतांमध्ये फरक करता येतो. वास्तविक खत पाण्यात सहज विरघळते. आज आपण या लेखात शेतकऱ्यांना खरे खत ओळखण्याचे सोपे मार्ग पाहू जे उपयोगी ठरतील.

 'डीएपी' खरे की बनावट अशापद्धतीने ओळखा

 या दोन सोप्या पद्धती वापरून डीएपी खरे आहे की बनावट हे पटकन ओळखता येते….

1- पहिली पद्धत- या पद्धतीत डीएपी चे काही दाणे हातात घ्यावेत आणि त्यात चुना टाकून तंबाखू कशी आपण हातावर चोळतो अर्थात मॅश करतो अशा पद्धतीने करा. जर त्यातून तीव्र वास येत असेल म्हणजेच ज्याचा वास घेणे कठीण होईल, तर ती डीएपी खरे आहे हे समजा.

नक्की वाचा:गोगलगायींचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी 'क्रॉपसॅप' योजना ठरणार शेतकऱ्यांसाठी वरदान

2- दुसरी पद्धत- जर आपण तव्यावर काही डीएपीची दाणे मंद आचेवर गरम केले आणि हे दाणे फुगले  तर समजून घ्या की हे खरे डीएपी आहे.

3- खऱ्या डीएपी चे वैशिष्ट्ये- डीएपी चे खरे वैशिष्ट्य म्हणजे त्याचे दाणे कडक असतात आणि नखांनी सहज तुटत नाहीत. तसेच ते तपकिरी काळे आणि तपकिरी रंगाचे असतात.

नक्की वाचा:धक्कादायक! हजार कोटी रुपयांच्या सबसिडीचा गैरवापर; खतांचा काळा बाजार उघडीस

 अशापद्धतीने ओळखा युरिया खरा की खोटा

 युरिया खरा की खोटा ओळखण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे युरियाचे काही दाणे घेऊन ते एका तव्यावर गरम करण्यासाठी ठेवा आणि खालून जाळ वाढवा.

तेव्हा तव्यावर युरियाचे कुठलेही अवशेष तुम्हाला दिसणार नाहीत. असे जेव्हा  असेल तेव्हा तो युरिया खरा आहे असे समजा.

 युरिया  खरा की खोटा ओळखण्या मधील महत्त्वाचे मुद्दे

1- युरियाची दाणे जवळजवळ समान आकाराचे चमकदार, पांढरे आणि कडक दाणे असतात तसेच ते पाण्यात पूर्णपणे विरघळतात आणि त्यांचे द्रावण स्पर्श केल्यानंतर थंडगार वाटते.

नक्की वाचा:शेतकऱ्यांसाठी फायदेशीर! 'पीओपी' लॉन्च, आता शेतमाल राज्याच्या बाहेर सहजपणे विकता येईल, वाचा माहिती

English Summary: farmers use this small and important tricks and know about urea real or fake Published on: 15 July 2022, 06:42 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters