1. कृषीपीडिया

हायड्रोपोनिक्स पद्धतीने उत्पादित करा दोन लाखांचा भाजीपाला

कोरोना व्हायरसमुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांचा रोजगार गेला आहे. मोठं- मोठ्या कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवत आहेत, यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. परंतु तुम्ही जर शेतीविषयी माहिती ठेवून असाल तर आपण उपासमारीला बळी पडणार नाहीत. कारण की आम्ही तुम्हाला अशा एका व्यवसायाविषयी माहिती देत आहोत त्यातून आपण मोठ कमाई करु शकता.

भरत भास्कर जाधव
भरत भास्कर जाधव


कोरोना व्हायरसमुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांचा रोजगार गेला आहे. मोठं- मोठ्या कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवत आहेत, यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे.  परंतु तुम्ही जर शेतीविषयी माहिती ठेवून असाल तर आपण उपासमारीला बळी पडणार नाहीत. कारण की आम्ही तुम्हाला अशा एका व्यवसायाविषयी माहिती देत आहोत त्यातून आपण मोठ कमाई करु शकता.   या व्यवसायासाठी आपल्याकडे अंगण किंवा छत असावे. छत म्हणजे तुमचे घर स्लॅबचे असायला हवे.  सध्या टेरेस फार्मिंग खूप ट्रेडिंगमध्ये असून यात आपण रोख पैसा कमावू शकता. ही शेती अशी आहे की यात मातीची गरज नाही.    मातीशिवाय आपण शेती करु शकणार आहात. मातीचा उपयोग न करता झाडांना आवश्यक असलेली पोषक तत्वे पाण्याच्या साहाय्याने दिले जातात.   याला हायड्रोपोनिक्स (Hydroponics)  म्हटले जाते.   

टेरेसवरील शेतीचा व्यवसाय हा खूप लाभकारक आहे, आयआयटीमधून पदवी घेतलेल्या कौस्तुभ खरे आणि साहिल पारिख यांनी हा टेरेस शेती व्यवसाय सुरू केला यात त्यांना चांगला फायदा झाला.   आज आपण या व्यवसायाविषयी जाणून घेणार आहोत.   कौस्तुभ खरे आणि साहिल पारिख  यांची कंपनी खेतीफाई ही फक्त १९ हजार रुपयांमध्ये २०० वर्ग मीटरच्या छतावर शेती बनवून ७०० किलोग्रॅम भाजीपाला उत्पादित करत आहे.

विना माती आणि कमी पाण्यातील शेती - या दोघांनी असा मॉडेल तयार केला आहे.   यात मातीची गरज नसते शिवाय पानी पण कमी लागते.   छतावर शेती करण्यासाठी क्यारी बनवली आहे. ही वॉटरप्रुफ आहे.

सेंद्रिय साधनांची मदत -  या वाफ्यांमध्ये भेंडी, टमाटे, वांगे, मेंथी, पालक, आणि मिर्चीचे उत्पादन घेतात.    टेरेस शेती बनविण्यासाठी नारळाचे कसण्याची गरज असते. घरावर अधिक वजन पडू नये, म्हणून मातीचा उपयोग केला जात नाही. या शेतीसाठी नारळाच्या सालीऐवजी काही मिश्रणही टाकले जाते. यामुले पिके लवकर मोठी होत असतात.   जमिनीचा आकार कमी कमी होत असल्याने या क्यारिया म्हणजे बेडला मोठी मागणी वाढणार आहे. ४ फूट बाय ४ फूट चार क्यारियां लावल्यानंतर एका परिवारासाठी आपण महिन्याभराचा भाजीपाला उगवू शकतो.

दिवसेंदिवस कमी होत असलेले शेतीचे क्षेत्र आणि  सेंद्रिय अन्न पदार्थाविषयीचा ओढा यामुळे अर्बन फार्मिंगमध्ये नव्या पद्धतीचे मागणी वाढली आहे. मागणी वाढल्याने व्यापारी आणि शहरी शेतकरी छत किंवा पार्किंगच्या जागेत शेती फुलवत आहे.   या पद्धतीत मातीची गरज नसते.    मातीची गरज नसल्याने छोट्य़ा जागेत ही पद्धत यशस्वी होते.   एक लाख खर्चात आपण दोन लाख रुपयांचा भाजीपाला उत्पादित करु शकतो. या शेतीच्या पद्धतीला हायड्रोपानिक्स म्हटले जाते.   या पद्धतीने पाण्याच्या साहाय्याने झाडांना पोषक तत्वे दिली जातात.   झाडे मल्टी लेयर फ्रेमच्या मदतीने टिके पाईपने उगवले जातात. आणि त्यातून पोषक तत्वे दिले जातात.  माती नसल्याने छतावर भार पडत नसतो.
 

English Summary: earn two lacs from vegetable's with help of Hydroponics Published on: 16 June 2020, 01:41 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters