1. कृषीपीडिया

गेम चेंजर ठरेल उसाच्या पाचटाचे व्यवस्थापन! वाचेल निविष्ठावरील विनाकारण खर्च, जाणून घेऊ सविस्तर

आपल्याकडे बहुतांश शेतकरी उसाची तोडणी झाल्यानंतर उसाचे पाचट जाळून टाकतात. परंतु याच्याने फायदा तर होतच नाही परंतु नुकसानच खुप होते. पाचट जाळल्यामुळे जमिनीतील सेंद्रिय पदार्थ जळतात व नष्ट होतात व त्या कारणाने जमिनीतील सेंद्रिय घटकांचे प्रमाण खूपच कमी होते.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
use of dry blades of sugercane for organic fertilizer

use of dry blades of sugercane for organic fertilizer

आपल्याकडे बहुतांश शेतकरी उसाची तोडणी झाल्यानंतर उसाचे पाचट जाळून टाकतात. परंतु याच्याने फायदा तर होतच नाही परंतु नुकसानच खुप होते. पाचट जाळल्यामुळे जमिनीतील सेंद्रिय पदार्थ जळतात व नष्ट होतात  व त्या कारणाने जमिनीतील सेंद्रिय घटकांचे प्रमाण खूपच कमी होते.

आधीच शेणखताचा वापर भरपूर कमीझाला आहे व त्याऐवजी रासायनिक खतांचा असंतुलित वापर वाढल्याने एकंदरीत जमिनीचे आरोग्य धोक्यात आले आहे. परंतु उसाची तोडणी झाल्यानंतर  शिल्लक पाचट जाळून टाकतात ती जर एक आड एक सरीत ठेवून व्यवस्थित कुजवली तर जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते व ओलावा जास्त काळ टिकून राहतो. एवढेच नाही तर पाण्याचा वापर पन्नास टक्‍क्‍यांपर्यंत कमी करता येऊ शकतो. या लेखामध्ये आपण उसाच्या पाचटाचे काही महत्त्वाचे फायदे जाणून घेऊ.

नक्की वाचा:गाव पातळीवर ठरेल नारळ प्रक्रिया उद्योग यशस्वी व त्या माध्यमातून होईल गावाचा आणि पर्यायाने स्वतःचा विकास

सेंद्रिय खत म्हणून उपयुक्त

1- जर आपण उसाच्या एक हेक्‍टर क्षेत्राचा विचार केला तर त्यामधून जवळ जवळ 12 टनापर्यंत  पाचट मिळते. जर हे पाचक उजवली तर जवळजवळ पाच ते सहा टन सेंद्रिय खत मिळते. त्यामुळे जमिनीची सुपीकता तर वाढतेच परंतु आरोग्य देखील उत्तम होते. यामुळे होते असे की जमिनीला पाचट पुढे आलेली सुपीकता कमीत कमी तीन वर्ष टिकते व त्यामुळे तितक्या काळ खोडव्याची पीकही चांगले पद्धतीने घेता येते.

 आंतरपीक घेणे होते सुलभ

 उसाच्या खोडव्यामध्ये एका सरी आड पाचट ठेवल्याने मध्ये एक सरी रिकामी राहते. या रिकाम्या सरी  मध्ये शेतकऱ्यांना आंतरपीक घेता येते. जसं की चवळी, उडीद, मूग सारखे द्विदलवर्गीय पिकेघेता येतात. या पिकांचे अवशेष देखील सरीत राव दिले तर यांच्या औषधाच्या पासून देखील सेंद्रिय खत तयार होते त्यामुळे जमिनीची सुपीकता सुधारते.

 मशागत जवळजवळ पन्नास टक्के वाचते

 उसाचे पाचट सरित दाबल्याने या सरीत प्रकारचे आच्छादन तयार झाल्याने तनउगवत नाही.त्यामुळे तन व्यवस्थापनावरील चा खर्च वाचतो व आपण उसाला देत असलेल्या अन्नद्रव्यांचा होणारा अपव्यय देखील टाळता येतो.

नक्की वाचा:युरियाचा वापर करतात पिकांसाठी?तर सांभाळून, अतिवापराचे होऊ शकतात हे दुष्परिणाम

ओलावा टिकविण्यास मदत होते

 जेव्हा आपण पाचट एका सरी आड ठेवतो त्यावेळी सरीत पाणी देण्यासाठी एका सरी आड पाणी द्यावे लागते. एवढेच नाही तर पाच ठेवल्यामुळे पन्नास टक्के शेतात आच्छादित  राहिल्याने बाष्पीभवनाचा वेग देखील कमी होतो व ओलावा टिकतो. पाचट मुळे जमिनीतील ओलावा 15 दिवसांच्या पुढे टिकतो. त्यामुळे परत परत पाणी देण्याची गरज राहते. पाचट सरीत ठेवलेले पाणी शोषत  असल्याने पाणी दिल्यानंतर लवकर वापस येतो. जमिनीमध्ये पाणी व हवेचे योग्य संतुलन राहते व मुळांची वाढ चांगल्या प्रकारे होते.

 निविष्ठावरील खर्च वाचतो

जेव्हा आपण पाचट ठेवतो तेव्हा त्यामधील मुख्य अन्नद्रव्य जसे की  नत्र, पोटॅश, स्फुरद तसेच दुय्यम अन्नद्रव्य पिकांना मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतात. त्यामुळे उत्पादनात वाढ होते. त्यामुळे रासायनिक खतांवर होणारा विनाकारण खर्च कमी होतो. रासायनिक खते कमी वापरल्याने देखील 10 ते 15 टक्के उत्पादनात वाढ होते.

English Summary: dry blades of sugercane crop is exllent organic fertilizer for land soil fertility Published on: 19 March 2022, 06:51 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters