1. कृषी व्यवसाय

तांदूळ प्रक्रिया उद्योगातील व्यावसायिक संधी राईस मिल

शेतीशी निगडित असणाऱ्या ग्रामीण भागातील बेरोजगार तरुणांना सहजतेने करता येईल असा हा उद्योग आहे. ग्रामीण भागातील तरुण तसेच शहरी भागातील बेरोजगार तरुण देखील शेतकऱ्यांकडून कच्चा माल खरेदी करून त्या मालावर प्रक्रिया करून बाजारपेठेतील व्यापाऱ्यांना विकू शकतात.

KJ Maharashtra
KJ Maharashtra
rice mill

rice mill

शेतीशी निगडित असणाऱ्या ग्रामीण भागातील बेरोजगार तरुणांना सहजतेने करता येईल असा हा उद्योग आहे. ग्रामीण भागातील तरुण तसेच शहरी भागातील बेरोजगार तरुण देखील शेतकऱ्यांकडून कच्चा माल खरेदी करून त्या मालावर प्रक्रिया करून बाजारपेठेतील व्यापाऱ्यांना विकू शकतात.

 भारताच्या वाढत्या लोकसंख्येला अन्नधान्याची गरज भासते. तांदूळ शेतीतून जे पीक निघते त्याला आपल्याकडे शेती असे म्हणतात. या शेतीतून उत्पादित तांदळावर असणारे टरफले काढून त्याच्या आतील भाग हा  तांदूळ म्हणून  वापरला जातो. या लेखात आपण राईस मिल या व्यवसाय विषयी माहिती घेऊ.

 राईस मिल चा व्यवसाय कसा करावा?

 राईस मिल मध्ये रोज हजारो टन धान्याचे कांडप, त्यावर प्रक्रिया करून व ते धान्य त्याच्या प्रतवारी प्रमाणे वेगळे करून व स्वच्छ करून ग्राहकांच्या मागणीप्रमाणे पाच किलो पासून पन्नास किलो पर्यंत च्या बॅगेत पॅक केले जाते. तांदळामध्ये बासमती, इंद्रायणी, आंबेमोहर, रत्नागिरी, कोलम, आशा तांदळाच्या प्रमुख व मुख्य मागणी असलेल्या जाती आहेत. शेतकऱ्यांकडून बाजारभावाप्रमाणे भात खरेदी करायचे व ते राईस मिल मध्ये आणून प्रक्रिया करून  मागणीप्रमाणे पॅकिंग करून व्यापाऱ्यांना विकायचे असा हा व्यवसाय आहे. बरेच राईस मिल व्यवसायिक हे ठराविक जातीचा माल शेतकऱ्यांकडून विकत घेऊन त्या जातीवर प्रक्रिया करून तो बाजारात विकतात व आपला ब्रँड तयार करतात.

हीच पद्धत जास्तीत जास्त राईस मिल व्यावसायिक वापरतात. भांडवलाची क्षमता असलेल्या नव उद्योजकांनी या व्यवसायात येण्यास काहीच हरकत नाही.

 या व्यवसायासाठी उपलब्ध बाजारपेठ

 ग्रामीण व शहरी भागातील सर्वच किराणामाल दुकानांमध्ये तांदूळ विकला जातो. तसेच सुपर मार्केट, अन्नधान्याचे ठोक व्यापारी व होलसेल व्यापारी तसेच मोठे मोठे मॉल यांना त्यांच्या मागणीप्रमाणे माल पुरवता येतो.

English Summary: bussiness oppourtunity in rice mill udyog rice processing Published on: 22 July 2021, 02:29 IST

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters