पुणे
मराठवाडा आणि विदर्भासाठी हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे. पण पावसाने हुलकावणी दिली आहे. त्यामुळे हातात आलेली पीके जाण्याची शक्यता शेतकरी व्यक्त करत आहेत. सध्या खरीपाच्या पिकांना आता पाण्याची जास्त गरज आहे. पण हवामान खात्याचा अंदाज खरा होताना दिसत नाही.
हवामान विभागाने मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांना जोरदार पावसाचा अंदाज दिलाय. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिला. बीड जिह्यातही काही ठिकाणी पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.
विदर्भातील अमरावती, चंद्रपूर, गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात पावसाचा हवामान खात्याने विजांसह जोरदार अंदाज व्यक्त केला आहे. यासोबतच राज्याच्या इतर भागांमध्येही पावसाचा अंदाज दिला आहे.
दरम्यान, आज विदर्भातील अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.
Published on: 22 August 2023, 05:21 IST