Weather

Winter Season In Maharashtra : परतीच्या पावसाने शेवटच्या सत्रात पावसाने अक्षरश: झोडपून काढले. यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या पिकाचे अतोनात नुकसान झाले. गेली चार महिने पावसानं चिंब भिजवल्यानंतर आता राज्यात हिवाळा सुरू झाला आहे. पाऊस थांबल्यानंतर एकाच आठवड्यात थंडीचा कडाका (bitter cold) वाढलाय.

Updated on 30 October, 2022 11:38 AM IST

Winter Season In Maharashtra : परतीच्या पावसाने शेवटच्या सत्रात पावसाने अक्षरश: झोडपून काढले. यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या पिकाचे अतोनात नुकसान झाले. गेली चार महिने पावसानं चिंब भिजवल्यानंतर आता राज्यात हिवाळा सुरू झाला आहे. पाऊस थांबल्यानंतर एकाच आठवड्यात थंडीचा कडाका (bitter cold) वाढलाय.

ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून राज्यात थंडीची चाहूल लागली आहे. त्यातच आता हिवाळ्याबाबत राज्याच्या हवामान विभागानं महत्त्वपूर्ण (Department Meteorology) अंदाज वर्तवला आहे. प्रशांत आणि हिंदी महासागराच्या पृष्ठभागाचं तापमान खाली आलं आहे. परिणामी समुद्राचा पुष्ठभाग थंड झाल्यानं महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात कडाक्याची थंडी पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.

त्याचबरोब ही थंडी फक्त महाराष्ट्रातच पडणार नाही, तर समुद्रातील या हवामानबदलाचे परिणाम संपूर्ण देशात पाहायला मिळणार आहेत. त्यामुळं आता येत्या काही दिवसांत राज्यात कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: साखरेवरील निर्यातबंदी वाढवली; केंद्र सरकारने 'या' कारणांसाठी घेतला निर्णय

सध्या ऑक्टोबर महिना सरत आला असला तरी नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीसह फेब्रुवारीत राज्यात थंडीचा जोर वाढणार अंदाज आहे. राज्यात गेल्या काही महिन्यांपासून रब्बी पिकांच्या उत्पादनात मोठी वाढ झाल्यानं आता गव्हाच्या पेरणीसाठी थंडीचं वातावरण पोषक असतं. त्यामुळं आता राज्यात यंदा गव्हाच्या उत्पादनातही वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हेही वाचा: आनंदाची बातमी: किसान समृद्धी केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सर्व सुविधा एकाच ठिकाणी मिळणार

दिवाळी नंतर थंडीला सुरुवात झाली असून येत्या काळात थंडीचा कडाका आणखी वाढण्याची शक्यता आहे. ऑक्टोबर महिन्याचा आढावा घेतल्यास १९६८ मध्ये पुणे शहरात तापमान ९.४ अंश सेल्सिअस इतके नोंद झाले होते. त्यानंतर यावर्षी ऑक्टोबरच्या शेवटच्या दिवसांत १२.६ अंश सेल्सिअर तापमानाची नोंद झाली आहे.

हेही वाचा: कापसाच्या दरात मोठी घसरण; जाऊन घ्या आजचा दर

English Summary: Winter Season: How cold will be in the state after heavy rains
Published on: 30 October 2022, 11:38 IST