Maharashtra Rain :- यावर्षी मान्सूनची एकंदरीत परिस्थिती पाहिली तर सुरुवातच निराशाजनक झालेली होती. जून महिना संपूर्ण कोरडा गेला होता व त्यानंतर जुलै महिन्याची सुरुवात चांगल्या पावसाने झाली व संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी पाऊस झाला. त्यामुळे खरिपाच्या पेरण्यांना वेग येऊन पेरण्या देखील पूर्ण झालेल्या आहेत.
परंतु सध्या दहा ते पंधरा दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे आता बऱ्याच ठिकाणी पिके कोमेजू लागली असून शेतकरी चातकासारखी पावसाची वाट पाहत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न आहे की आता पाऊस कधी सुरू होईल? परंतु येणाऱ्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.
18 ऑगस्टपासून महाराष्ट्रात पावसाची शक्यता
त्याबद्दल सविस्तर वृत्त असे की, थांबलेला पाऊस हा 18 ऑगस्ट नंतर सुरू होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. भारतीय हवामान विभाग विभागाचे अधिकारी के एस होसाळीकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात 18 ऑगस्ट पासून पावसाची शक्यता असून 18 ते 24 आणि 25 ते 31 ऑगस्ट या दरम्यान महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे. महत्वाचे म्हणजे या कालावधीत विदर्भातील काही भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
तसेच ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यामध्ये कोकणात पाऊस पुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. तसेच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात सरासरी पाऊस होईल असं देखील हवामान विभागाने अंदाज व्यक्त केले आहे.
विदर्भात कशी राहील पावसाची स्थिती?
यावर्षी ८ जूनला केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर 11 जूनला रत्नागिरीत मान्सून पोहोचला. परंतु त्यानंतरच्या कालावधीत बिपरजॉय चक्रीवादळामुळे मान्सूनचा प्रवास रखडला होता.
परंतु त्यानंतरच्या कालावधीत चंद्रपूर मधून मान्सूनने प्रगती केली होती.
Published on: 14 August 2023, 03:52 IST