Weather Update : 12 जूनला राज्यातील काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. कोकण, मराठवाडा, मध्य महाराष्ट्राला इथे आज वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. तर संपूर्ण विदर्भात 15 जूनपर्यंत विजांच्या कडकडाटासह मान्सूनपूर्व वादळी पावसाचा अंदाज आहे.
आज हवामान विभागाकडून महाराष्ट्रात यलो अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान रविवारी अखेर मान्सून राज्यात दाखल झाला आहे. नैऋत्य मान्सूनचं रविवारी महाराष्ट्रात आगमन झालं आहे. दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्राचा काही भाग रविवारी मान्सूनं व्यापला आहे.
आला रे आला पाऊस आला! अखेर मान्सून महाराष्ट्रात दाखल, कुठंपर्यंत पोहोचला, जाणून घ्या अपडेट
मान्सूनची वाटचाल सकारात्मकरित्या सुरु झालेली असतानाच इथं हवामान विभागानं यलो अलर्ट दिला आहे. पण, हा अलर्ट मान्सूनच्या धर्तीवर नसून बिपरजॉय या चक्रिवादळामुळं बदलणाऱ्या हवमानाच्या धर्तीवर देण्यात आला आहे.
सध्याच्या घडीला हे वादळ मुंबई आणि महाराष्ट्राच्या किनाऱ्यांवरून दूर असलं तरीही त्याचे परिणाम मात्र गोव्यासह कोकण किनारपट्टीवरही दिसणार आहेत. शिवाय विदर्भातही पुढील तीन दिवस विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला असून, हा हवामान विभागाचा यलो अलर्ट असल्याचं सांगण्यात येत आहे.
Published on: 12 June 2023, 09:19 IST