Monsoon News : देशात मान्सूनचे आगमन झाल्याने पावसाला सुरुवात झाली आहे. पुढील ४ ते ५ दिवस ईशान्य भारत आणि दक्षिणेकडील भागात जोरदार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर पुढील ५ दिवस आणि मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला. तसंच येत्या ५ दिवसात राज्यात मान्सून दाखल होण्याचा ही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
मान्सूनला पुढे सरकण्यासाठी अनुकूल वातावरण असल्यामुळे राज्यात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. विदर्भ आणि कोकणात देखील पावसाचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.
ईशान्य भारत आणि दक्षिण भारतात मान्सून दाखल झाल्यामुळे या भागातील राज्यात पावसाने हजेरी लावली आहे. केरळमध्ये विजांचा कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह पाऊस आहे. कर्नाटक, तामिळनाडू, पुद्दुचेरी, कोस्टल आंध्र प्रदेश, तेलंगणा, रायलसीमा या भागात ७ दिवस पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
बंगालच्या उपसागरापासून ईशान्येकडील राज्यांपर्यंत मान्सून पोहचला आहे. त्यामुळे अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मेघालयमध्ये विजांचा कडकडाट पाऊस होत आहे. तसेच या भागात विजांच्या कडकडाटासह देखील पाऊस होण्यासा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर दुसरीकडे नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये पुढील आठवडाभर पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.
उत्तर भारतात उष्णतेची लाट
देशात मान्सूचे आगमन झाले असले तरी उत्तर भारतात मात्र अद्यापही उष्णतेची लाट कायम आहे. हरियाणा, मध्य प्रदेश, पंजाब, राजस्थान, उत्तराखंड, छत्तीसगडच्या, ओडिशा, हिमाचल प्रदेश, झारखंड, बिहार, राजस्थान, दिल्ली, छत्तीसगड या राज्यांत उष्णतेची लाट कायम आहे. उत्तर प्रदेशमधील कानपूर येथे ४८.२ डिग्री सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली आहे.
Published on: 01 June 2024, 05:23 IST