पुणे : राज्यात मागील आठवड्यापासून ऊन सावल्यांचा खेळ सुरु आहे. बहुतांश भागात पावसाने हलक्या ते जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. तर आज (दि.४) रोजी कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्याच्या अनेक भागात पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे राज्यावर पावसासह गारपीटीच संकट आलं आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील अनेक भागांमध्ये पावासानं हजेरी लावली आहे. याचा मोठा फटका हा शेतकऱ्यांना बसला आहे. फळबागांचं मोठं नुकसानं झालं आहे.
राज्यात गारपीट आणि पावसामुळे शेतकऱ्यांच मोठं नुकसान झाल आहे. दरम्यान आज पुन्हा एकदा हवामान विभागाकडून कोकण, मराठवाडा, विदर्भातील अनेक जिल्ह्यात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. राज्यात पुन्हा एकदा जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागा कडून देण्यात आला आहे.
तर दुसरीकडे मुंबईत आज सर्वत्र दमट वातावरण निर्माण झालं आहे. भारतीय हवामान विभागाकडून गेल्या दोन दिवसापूर्वी मुंबईत अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. हवामान विभागाकडून वर्तवलेल्या अंदाजानुसार मुंबईतील दादर, वरळी आणि परेळ भागात पावसाची रिमझिम पाहायला मिळाली.
Published on: 04 April 2025, 11:52 IST