Weather

Weather News : उत्तर महाराष्ट्रात देखील थंडीचा कडाका कमी झाल्याचं पाहायला मिळत आहे. सूर्यप्रकाश देखील राज्यात आता सर्वत्र दिसून येत आहे. पश्चिम महाराष्ट्रातूनही आता थंडीनं दडी मारली आहे. यामुळे तापमानाचा पारा वाढताना दिसत आहे. ठाणे आणि मुंबईतही तापमानाचा आकडा वाढत असून ठाण्यामध्ये दिवसाचं तापमान ४० अंशांपर्यंत पोहोचू लागला आहे.

Updated on 13 February, 2024 9:55 AM IST

Maharashtra Weather News : राज्यातील वातावरणात बदल झाल्याच पाहायला मिळत आहे. तसंच पावसाला देखील पोषक वातावरण तयार असल्याने तापमानात वाढ झाली आहे. यामुळे नागरिकांना आता गरमीला सामोरे जावे लागत आहे. पुढील २४ तासांमध्येसुद्धा मराठवाडा आणि विदर्भावर पावसाचं संकट निर्माण झालं आहे. तर काही ठिकाणी गारपीटीचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांपुढे आता संकटाचा डोंगर उभा राहिला आहे.

तापमानात वाढ

उत्तर महाराष्ट्रात देखील थंडीचा कडाका कमी झाल्याचं पाहायला मिळत आहे. सूर्यप्रकाश देखील राज्यात आता सर्वत्र दिसून येत आहे. पश्चिम महाराष्ट्रातूनही आता थंडीनं दडी मारली आहे. यामुळे तापमानाचा पारा वाढताना दिसत आहे. ठाणे आणि मुंबईतही तापमानाचा आकडा वाढत असून ठाण्यामध्ये दिवसाचं तापमान ४० अंशांपर्यंत पोहोचू लागला आहे.

देशाची राजधानी दिल्लीसह उत्तर भारतात गेल्या काही दिवसांपासून थंडीचा कहर कमी होऊ लागला आहे. फेब्रुवारीपासून थंडी कमी झाली असून तापमानातही वाढ होत आहे. आज देशाच्या बहुतेक भागांमध्ये किमान तापमान ७-१२ डिग्री सेल्सियस दरम्यान आहे. तसेच, उत्तर-पश्चिम भारताच्या अनेक भागांमध्ये आणि उत्तर मैदानी प्रदेशांसह त्याच्या आसपासच्या भागात तापमान सामान्यपेक्षा २-४ अंश सेल्सिअस कमी राहू शकते.

दिल्ली, हरियाणा आणि उत्तर प्रदेशात सकाळ-संध्याकाळ हलके धुके दिसून येत आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार, एक चक्रीवादळ मराठवाड्यावर तर दुसरे दक्षिण विदर्भात आहे. तसेच, खालच्या ट्रोपोस्फियर पातळीवर तुरळक गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज पूर्व मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि झारखंडमध्ये पावसाची शक्यता आहे.

आज बिहार, पश्चिम बंगाल आणि सिक्कीम भागात हलक्या पावसाची शक्यता आहे. पूर्व मध्य प्रदेश आणि उत्तर छत्तीसगडमध्ये आज आणि उद्या तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. १३ ते १५ फेब्रुवारी दरम्यान ओडिशामध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशमध्ये हलक्या तुरळक पावसासह हिमवृष्टी होऊ शकते. उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, पश्चिम राजस्थानमध्ये हलका पाऊस पडू शकतो.

English Summary: Weather Update Unseasonal crisis over Vidarbha Find out how the temperature will be for the next 2 days
Published on: 13 February 2024, 09:55 IST