Cold Weather Update : उत्तर भारतात थंडीची लाट काही अंशी कमी झाली आहे. पण उत्तर भारतातील हवामानाचा राज्यातील वातावरणात चांगलाच परिणाम झाला आहे. राज्याच्या विविध भागात सध्या ढगाळ वातावरण असून किमान तापमानात वाढ होत आहे. राज्यातील तापमानात मागील काही दिवसांपासून चढ-उतार पाहायला मिळत आहे.
उत्तर भारतातील राज्यात थंडीचा कडाका अजून कायम आहे. उत्तर भारतातील अनेक भागात तापमान ६ ते ९ अंशांच्या दरम्यान आहे. तर पंजाब, हरियाना, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशच्या काही भागात थंडीची लाट कायम राहण्याची शक्यता आहे.
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने बंगालच्या उपसागरावरून बाष्पयुक्त वारे वाहत आहे. त्यामुळे देशासह राज्यात पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे राज्यात पुढील दोन ते तीन दिवसात पावसाची शक्यता आहे.
दरम्यान, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात सध्या थंडीचा कडाका कमी झाला असला तरी या भागात ढगाळ वातावरण आहे. मात्र इथं पावसाचे ढग घोंगावताना दिसत आहेत. या भागातील जिल्ह्यांमध्ये किमान तापमानात घट झाल्यामुळं थंडीचे प्रमाणही कमी झाले आहे. ज्या भागात कमी तापमान होते तेथिल तापमान ३ ते ४ अंशाने तापमाान वाढले आहे.
Published on: 04 January 2024, 11:06 IST