Maharashtr Weather Update : उत्तर भारतात थंडीचा कडाका कमी असून राज्यातही आता थंडी वाढताना दिसत आहे. तसंच वातावरणात सातत्याने बदल होत असल्याने तापमानात चढ-उतार होत आहे. आता पुन्हा राज्यातील वातावरणात बदल झाल्याने पुढील काही दिवस मुंबईसह ठाणे, कोकण आणि पुणे शहर गारठताना दिसत आहे. तर पुढील तीन ते चार दिवस धुकं आणि थंडी वाढेल, असा अंदाज देखील हवामान खात्याने दिला आहे.
उत्तर भारतात थंडीचा जोर कायम
उत्तर भारतातील दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश आणि बिहारमधील बहुतांश ठिकाणी तापमान १० अंशांच्या खाली आहे. यामुळे हवेत चांगलाचा गारवा आहे. पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये तापमान ३ अंशांपर्यंत आहे.
नाशिक येथिल निफाड येथील गहू संशोधन केंद्रात राज्यातील नीचांकी ९.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. तर धुळे येथील कृषी महाविद्यालयात ९.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
आयएमडीच्या अंदाजानुसार, पंजाब, हरियाणा आणि चंदीगडच्या अनेक भागांमध्ये शनिवारी सकाळपर्यंत आणि काही भागात रात्री-सकाळी काही तास आणि पुढील चार दिवस दाट धुके कायम राहण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशच्या काही भागांमध्ये शनिवारी आणि रविवारी सकाळी काही तासांसाठी आणि पुढील तीन दिवस वेगवेगळ्या भागात रात्री-सकाळी दाट धुके कायम राहण्याची शक्यता आहे.
Published on: 20 January 2024, 10:58 IST