Maharashtra News : उत्तर भारतात वाहणाऱ्या थंड वाऱ्याचा परिणाम राज्यातील वातावरणावर झाले आहे. तर उत्तर भारतात थंडीचा कडाका कायम आहे. मात्र आता राज्यातील वातावरणात बदल झाल्याने थंडीचा कडाका चांगलाच वाढल्याच पाहायल मिळत आहे. तसंच अनेक भागातील तापमान १० अंशाच्या खाली आहे. उत्तर महाराष्ट्रात थंडीची लाट चांगलीच वाढली आहे.
उत्तर भारतातील थंडीची लाट आता महाराष्ट्रात पोहचली आहे. यामुळे राज्यातील वातावरणात बदल झाला आहे. उत्तर महाराष्ट्रात थंडीचा पारा ९ अंशांच्या खाली आला आहे. यामुळे थंडीचा कडाका जाणवत आहे.
हवामान खात्याच्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशात किमान तापमान ३ ते ५ अंश सेल्सिअस दरम्यान राहील. त्याच वेळी, पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, राजस्थान, मध्य प्रदेश, बिहारच्या बहुतांश भागात किमान तापमान ६ ते १० अंश सेल्सिअस दरम्यान आहे.
देशाची हवामान स्थिती
पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि राजस्थान आणि उत्तर मध्य प्रदेशच्या काही भागांमध्ये दाट ते दाट धुक्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्याच वेळी, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उप-हिमालयीन पश्चिम बंगाल, ओडिशा, आसाम, मेघालय, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये दाट धुके पडू शकते.
याशिवाय पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशच्या काही भागांमध्ये थंडीपासून तीव्र थंडीपर्यंतची परिस्थिती संभवते. त्याचवेळी उत्तराखंडमध्ये हिमवृष्टी होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे, २५ ते २८ जानेवारी दरम्यान पश्चिम हिमालयात हलका पाऊस आणि हिमवृष्टीसह काही मध्यम सरी पडण्याची शक्यता आहे.
Published on: 26 January 2024, 10:53 IST