Weather

Weather News : उत्तर भारतातील राज्यांमध्ये सध्या कडाक्याच्या थंडी आहे. थंडीबरोबरच धुक्यामुळे लोकांच्या अडचणीत वाढ होत आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, उत्तर भारतातील राज्यांना थंडीचे दिवस आणि धुक्यापासून दिलासा मिळताना दिसत नाही.

Updated on 22 January, 2024 10:58 AM IST

Maharashtra Weather Update : उत्तर भारताचा थंडीचा जोर कायम असल्याने गारठा आहे. या वातावरणाबरोबरच राज्यातील वातावरणावर देखील याचा परिणाम झालेल्या दिसून येत आहे. राज्यातील उत्तर महाराष्ट्रात तापमानाचा पारा १० अंशाखाली असल्याचे पाहायला मिळाला आहे. यामुळे राज्यात आता गारठा वाढताना दिसत आहे. राज्यातील तापमानात चढ-उतार सुरुच आहे. किमान तापमानात देखील चांगलीच घट दिसून आली आहे. यामुळे राज्यात थंडीचा जोर वाढला आहे.

उत्तर भारतातील राज्यांमध्ये सध्या कडाक्याच्या थंडी आहे. थंडीबरोबरच धुक्यामुळे लोकांच्या अडचणीत वाढ होत आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, उत्तर भारतातील राज्यांना थंडीचे दिवस आणि धुक्यापासून दिलासा मिळताना दिसत नाही. पुढील पाच दिवस उत्तर भारतातील राज्यांमध्ये दाट ते दाट धुके दिसून येईल. त्याचबरोबर पुढील तीन दिवस थंडीचा कडाका कायम राहणार आहे.

दिल्ली काश्मीरपेक्षा थंड

देशाची राजधानी दिल्लीबद्दल बोलायचे झाले तर येथे विक्रमी थंडी आहे. अलीकडेच येथे शिमल्याच्या तुलनेत कमी तापमानाची नोंद झाली. तर रविवारी थंडी आणि धुक्याने आणखी एक विक्रम मोडला. रविवारी सकाळी दिल्लीचे किमान तापमान श्रीनगरच्या बरोबरीने नोंदवले गेले. राष्ट्रीय राजधानीत रविवारी तापमान ४.८ अंश सेल्सिअस होते. जे हंगामाच्या सरासरीपेक्षा तीन अंशांनी कमी होते. येत्या काही दिवसांत दिल्लीत थंडी आणखी वाढणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.

English Summary: Weather Update temperature in the state cold increased see today weather news
Published on: 22 January 2024, 10:58 IST