Weather

Weather Update: गेल्या काही दिवसांपासून देशात आणि राज्यात सर्वदूर मान्सूनचा पाऊस कोसळत आहे. त्यामुळे शेतकरी वर्गाला दिलासा मिळाला आहे. तर काही भागात मुसळधार पाऊस पडल्यामुळे शेतीपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जून आणि जुलै महिन्यात सर्वाधिक पाऊस झाला असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.

Updated on 24 August, 2022 9:41 AM IST

Weather Update: गेल्या काही दिवसांपासून देशात आणि राज्यात सर्वदूर मान्सूनचा (Monsoon) पाऊस कोसळत आहे. त्यामुळे शेतकरी (Farmers) वर्गाला दिलासा मिळाला आहे. तर काही भागात मुसळधार पाऊस (Heavy Rain) पडल्यामुळे शेतीपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जून आणि जुलै महिन्यात सर्वाधिक पाऊस झाला असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.

यंदाच्या मान्सूनचा सर्वाधिक फटका विदर्भातील शेतकऱ्यांना बसला आहे. सरासरीच्या तुलनेत यंदा 34 टक्के पाऊस अधिक बरसला आहे. विदर्भात मान्सूनच्या (Vidarbha Monsoon) पावसाने 29 वर्षाचे रेकॉर्ड मोडले असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. तसेच नागपूर जिल्ह्यात देखील 60 टक्के अधिक पाऊस पडला असल्याचे नागपूर हवामान खात्याने (Nagpur Meteorological Department) सांगितले आहे.

विदर्भातही 11 जिल्ह्यांपैकी 9 जिल्ह्यांना मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. या जिल्ह्यांमध्ये सरासरी पेक्षा अधिक पाऊस कोसळला असल्याचे नागपूर हवामान विभाकडून सांगण्यात आले आहे. गडचिरोली जिल्ह्यात सर्वात जास्त 1446 मीमी पावसाची नोंद हवामान खात्याकडून करण्यात आली आहे.

Eknath Shinde: शेतकऱ्यांना सप्टेंबरपासून 50 हजारांचे अनुदान मिळणार; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

यंदाच्या मान्सूनचा सार्वधिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे. काही शेतकऱ्यांना मुसळधार पावसामुळे स्थलांतर करावे लागले आहे तर काहींची खरीप हंगामातील पिके पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे आता शेतकरी नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत आहे.

शेतकऱ्यांचे जास्त नुकसान

दरवर्षीच्या तुलनेत यंदा विदर्भात सर्वाधिक पाऊस पडला असल्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. खरीप हंगामातील (Kharif season) शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर आता दुबारपेरणीचे संकट ओढवले आहे. सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये मुसळधार बरसल्यानंतर शेतकऱ्यांना पेरणीयोग्य पाऊस झाला.

Wheat Rate: शेतकऱ्यांना मिळणार मोठा दिलासा; सणांमध्ये गव्हाचे दर वाढणार

मात्र 9 ऑगस्टपासून विदर्भात पुन्हा एकदा जोरदार पावसाळा सुरुवात झाल्यामुळे शेतकरी संकटात सापडला. मुसळधार पावसाचा अधिक फटका गडचिरोली. चंद्रपूर आणि नागपूर जिल्ह्यांना बसला आहे. तर महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पावसामुळे अनेकांचे जीव गेले आहेत.

यंदा मान्सूनचा पाऊस वेळेवर आल्यामुळे शेतकरी वर्ग चांगलाच सुखावला होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी खरीप पिकांची वेळेवर पेरणी केली होती. मात्र अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचा खरीप हंगाम वाया गेला आहे. मराठवाड्याला दुष्काळी पट्टा म्हणून ओळखले जाते. मात्र यंदा मराठवाड्यात देखील अधिक पाऊस झाला असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे.

महत्वाच्या बातम्या:
Weekly Horoscope: हा आठवडा सर्व राशीच्या लोकांसाठी कसा ठरेल? वाचा तुमचे राशीभविष्य
Garlic Farming: लसूण शेतीमधून 6 महिन्यांत तब्बल 10 लाखांपर्यंत मिळणार नफा; फक्त 'या' गोष्टींची काळजी घ्या

English Summary: Weather Update: Rain breaks 29-year record
Published on: 24 August 2022, 09:41 IST