Weather Update: यंदा नैर्ऋत्य मान्सून चार जून रोजी केरळमध्ये दाखल होऊ शकतो, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने मंगळवारी जाहीर केला. केरळमध्ये मान्सून दाखल होण्याची सर्वसाधारण तारीख एक जून आहे. त्या तुलनेत तीन दिवस उशिरा मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे.
नैऋत्य मान्सून त्याच्या नेहमीच्या वेळापत्रकापेक्षा तीन दिवसांनी उशीर होऊन 4 जून रोजी +/-4 दिवसांच्या मॉडेल त्रुटीसह केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे, असे भारतीय हवामान विभागाने मंगळवारी आपल्या अंदाजात म्हटले आहे.
यंदा सरासरीएवढाच पाऊस पडण्याचा अंदाज आयएमडीकडून मे महिन्याच्या सुरुवातीला वर्तवण्यात आला होता. त्या पार्श्वभूमीवर केरळमध्ये मान्सूनचे उशिरा होणारे आगमन हा चिंतेचा विषय ठरण्याची शक्यता आहे.
IMD : राज्यात या दिवशी उष्णतेची लाट येणार, हवामान विभागाकडून अलर्ट
‘एल निनो’ची स्थिती, हिंदू महासागरातील द्विध्रुव परिस्थिती आणि उत्तर गोलार्धात बर्फाचे आच्छादन कमी होण्याची शक्यता यांसारख्या कारणांमुळे यंदाच्या र्नैऋत्य मोसमी पावसावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
College of Veterinary Medicine : या ठिकाणी नवीन पशुवैद्यकीय महाविद्यालय होणार; राज्य सरकारचा निर्णय
मागील वर्षी सरासरीच्या तुलनेत १०६ टक्के पाऊस झाला. विभागाच्या अंदाजानुसार यंदा मोसमी पाऊस सरासरीएवढा पडण्याची शक्यता सुमारे ३५ टक्के, सरासरीपेक्षा कमी पडण्याची शक्यता सुमारे २९ टक्के तर सरासरीच्या तुलनेत जास्त पावसाची शक्यता केवळ ११ टक्के असल्याचे सांगण्यात आले आहे.
Published on: 17 May 2023, 11:17 IST