Weather News : राज्यातील वातावरणात झालेल्या बदलामुळे राज्याच्या काही भागात हलक्या पावसाने हजेरी लावली. आता पुन्हा राज्यातील वातावरण निवळले असून वातावरण कोरडे झाले आहे. तर काही भागात ढगाळ वातावरणाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तसंच वातावरण निवळल्यामुळे थंडीचा कडाका देखील वाढण्याची शक्यता हवामान खात्याने दिली आहे.
मागील दोन दिवसांपूर्वी राज्याच्या काही भागात पावसाने हजेरी लावली होती. यात सर्वाधिक सर्वात कोकणात झाला होता. मराठावाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्राच्याही काही भागात पावसाने हजेरी लावली होती. यामुळे काही अंशी शेतकऱ्यांना या पावसाचा आणि वातावरणाचा फटका बसला आहे.
आजपासून (दि.११) राज्यात पावसाची कमी आहे. मात्र ढगाळ वातावरण राहणार असून काही अंशी थंडी वाढण्याची शक्यता आहे. किमान तापमान चार ते पाच अंश सेल्सिअसने कमी होण्याचा अंदाज असून विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात गारवा वाढण्याची शक्यता आहे.
दरम्यान, राज्यातील वातावरणात झालेल्या बदलामुळे शेतकरी चिंतेत होते. मात्र आता पुन्हा वातावरण निवळले आहे. तसंच राज्यात ढगाळ वातावरणासह थंडी वाढण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
Published on: 11 January 2024, 11:18 IST