Weather Update: यंदाचा मान्सून(Monsoon) जोरदार बरसत आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात आणि राज्यात अनेक भागात मुसळधार पावसाने (heavy Rain) हजेरी लावली आहे. काही भागात पाणी साठल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पावसाचा परतीचा प्रवास सुरु झालं असून राज्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे.
राज्यातील काही भागात पावसाने मोकळीक दिली आहे. तर काही भागात मुसळधार कोसळत आहे. अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. तसेच नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा (Warning alert) देण्यात आला आहे.
राज्यात अनेक भागात ढगाळ वातावरण (Cloudy weather) पाहायला मिळत आहे. त्यामुळे अनेक भाजीपाला पिकांवर रोग पडण्याची शक्यता आहे. मुंबईसह ठाणे परिसरात पावसानं चांगली हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले.
मुंबईसह राज्यातील अनेक जिल्ह्यांत धो धो बरसणार; हवामान खात्याने दिला मुसळधार पावसाचा इशारा
त्याचबरोबर, पालघर, नंदूरबार, औरंगाबाद या जिल्ह्यातही पावसानं हजेरी लावली. दरम्यान आज सकाळपासून पुणे आणि परिसरात पावसाने हजेरी लावली आहे. तर वातावरण देखील ढगाळ असल्याचे पाहायला मिळत आहे.
राज्यातील पाऊस लवकरच परतीच्या प्रवासावर निघण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कारण मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला पोषक वातावरण निर्माण झाले असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात येत आहे. येत्या दोन दिवसांत मान्सून परतीचा प्रवास सुरु करण्याची शक्यता आहे.
सणासुदीच्या काळात सोन्याचे भाव घसरले! प्रति 10 ग्रॅम सोने 6880 रुपयांनी स्वस्त
राज्यात मध्य महाराष्ट्र (Maharashtra) आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाजही हवामान विभागानं वर्तविला आहे. बुधवारपर्यंत माॅन्सून वायव्य भारतातील राजस्थान, पंजाब, हरियाणा आणि गुजरातच्या काही भागातून माॅन्सून माघारी फिरण्याची शक्यता हवामान विभागने वर्तविली आहे.
हवामान विभागाने पुणे सोलापूरसह राज्यातील अनेक भागांना मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात हवामान खात्याकडून यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच अनेक भागातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या:
दिलासादायक! कापूस उत्पादकांचे येणार अच्छे दिन; या महिन्यात कापसाच्या दरात होणार मोठी वाढ
तेलाच्या किमतीत जोरदार घसरण! पेट्रोल डिझेलचे नवीनतम दर जाहीर...
Published on: 20 September 2022, 11:57 IST