Rain Update In Maharashtra : राज्यात मागील आठवडाभरापासून मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाल्याची पाहायला मिळाली आहे. यासोबतच पावसामुळे शेतपिकांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. देशात ३१ मे ला मान्सूनचे आगमन होण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. त्यापूर्वी आठवडा भरापासून राज्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे.
राज्यात एकीकडे उकाडा वाढला असल्याने त्यात पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे वातावरणात सतत बदल होत असल्याच पाहायला मिळत आहे. तर राज्यात मान्सूनपूर्व पावसाने धुमाकूळ घातला आहे. वादळी वाऱ्यांसह येणाऱ्या या पावसामुळंही नागरिकांची तारांबळ उडताना दिसत आहे. तसंच पावसामुळे शेतपिकांचं देखील नुकसान होत असल्याचं दिसून येत आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकणातील तुरळक क्षेत्रात उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. तसंच दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील 24 तासांमध्ये मुंबई शहर आणि उपनगरात उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. तर कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३६°C आणि २८°C च्या आसपास असेल.
Published on: 18 May 2024, 05:15 IST