Weather

मागच्या काही दिवस पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र आता मागच्या दोन-तीन दिवसात पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. दिल्ली, महाराष्ट्र, यूपीसह अनेक राज्यांमध्ये काल मुसळधार पाऊस झाला.

Updated on 09 October, 2022 9:33 AM IST

मागच्या काही दिवस पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र आता मागच्या दोन-तीन दिवसात पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. दिल्ली, महाराष्ट्र, यूपीसह अनेक राज्यांमध्ये काल मुसळधार पाऊस (Heavy rain) झाला.

महाराष्ट्रासह (maharashtra) 17 राज्यांमध्ये पुढील तीन दिवस मुसळधार पाऊस पडू शकतो. हवामान खात्याच्या सूचनेनुसार 2-3 दिवसांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. चक्रीवादळाचा प्रभाव किनारी आंध्र प्रदेश आणि लगतच्या भागात आहे. दक्षिण बंगालच्या उपसागराच्या मध्यभागी चक्रीवादळाचा प्रभाव कायम आहे.

हवामान खात्याने (Meteorological department) मुंबई आणि लगतच्या ठाणे, पालघर आणि कोकण विभागातील जिल्ह्यांसाठी पुढील दोन दिवस येलो अलर्ट (Yellow Alert) जारी केला आहे. पुढचे 3 दिवस राज्यात गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. सोसाट्याचा वाराही वाहण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. 

फक्त 2 मिनिटांत ब्लड प्रेशर, तणाव आणि वेदनांपासून मिळणार आराम; फक्त हे एकच काम करा

आज या भागांना यलो अलर्ट जारी

आज पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, पुणे, ठाणे, अहमदनगर, सोलापूर, लातूर, जालना, औरंगाबाद, जळगाव, धुळे, नाशिक, नंदूरबार या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. राज्यातील काही भागांत 11 ऑक्टोबरपर्यंत पाऊस कायम राहण्याची शक्यता आहे.

शेतकऱ्यांनो पपई लागवडीसाठी ऑक्टोबर महिना सर्वोत्तम; कमवू शकता लाखों रुपयांमध्ये उत्पन्न

महाराष्ट्रासह देशातील अनेक भागात सध्या पाऊस सुरु आहे. गोव्यासह कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार पावसाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. महत्वाचे म्हणजे पुढील 3 ते 4 दिवस कर्नाटकचा अंतर्गत भाग, आंध्र प्रदेशच्या किनारी भागात जोरदार पावसाची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या 
मिथुन, मीन, कन्या राशीच्या लोकांना मिळणार चांगली संधी; नशिबाचीही साथ लाभणार
महत्वाची बातमी! IFFCO ने डीएपी आणि युरियाच्या नवीन किमती केल्या जाहीर
LIC ने लॉन्च केली सर्वोत्तम पॉलिसी; वयाच्या 40 व्या वर्षी मिळणार 50 हजार रुपये पेन्शन

English Summary: Weather Update Heavy rain 17 states 3 days Meteorological department
Published on: 09 October 2022, 09:29 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)