Weather

मुंबई शहर आणि उपनगरांत सकाळच्या वेळी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तर शहर आणि उपनगरात उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता आहे.कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३५°C आणि २९°C च्या आसपास असेल.

Updated on 22 May, 2024 10:51 AM IST

Maharashtra Weather News : सध्या देशासह राज्यातील वातावरणात दिवसेंदिवस बदल होताना दिसत आहे. त्यातच आता सर्वांना मान्सूनची चाहूल लागली असताना देशातील तापमानाचा पारा वाढत आहे. तर दुसरीकडे मराठवाडा, विदर्भ आणि कोकणात पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. पुढील दोन दिवसात राज्यात पावसाचा अंदाज आहे.

दक्षिण कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह आणि सोसाट्याचा वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक क्षेत्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. तर उत्तर कोकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक क्षेत्रात उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता आहे.दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

मुंबई शहर आणि उपनगरांत सकाळच्या वेळी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तर शहर आणि उपनगरात उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता आहे.कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३५°C आणि २९°C च्या आसपास असेल.

दरम्यान, सध्या सर्वांना मान्सूनची चाहूल लागली असून देशात मान्सून लवकरच दाखल होण्याची शक्यता आहे. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मान्सून केरळात दाखल होण्याची शक्यता आहे. तर मागील काही दिवसांपूर्वी मान्सून अंदमानात दाखल झाला असून तो आता पुढे सरकत आहे.

English Summary: Weather Update Forecast of heat with rain in the state Know the weather forecast
Published on: 22 May 2024, 10:51 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)