Pune News : राज्यातील हवामानात दिवसेंदिवस बदल होत आहे. तर आता राज्यातील तापमान वाढण्यास सुरुवात झाल्याने गारठा काहीसा कमी झाला आहे. तसंच तापमानाचे प्रमाण वाढण्याची शक्यता हवामान खात्याने दिली आहे. मात्र उत्तर भारतात गारठा कायम आहे.
राज्यासह देशाच्या विविध भागात ३० डिसेंबर ते २ जानेवारी दरम्यान काही भागात पावसाची शक्यता हवामान खात्याने दिली आहे. मुंबईसह उपनगर, ठाणे, कोकण आणि विदर्भात थंडीचा गारठा कायम आहे. उत्तर भारतातील तापमान कमी झाल्याने राज्यातील हवामानावर त्याचा परिणाम झाला आहे.
उत्तर भारतात किमान तापमान दोन दिवसांपासून स्थिर आहे. पंजाब, हरियाना, चंदीगड, दिल्ली, बिहार आणि झारखंडमधील बहुतांशी भागात किमान तापमान ८ अंश सेल्सिअस ते १२ अंश सेल्सिअसरच्या दरम्यान आहे.
हवामानात चढ-उतार
मागील काही दिवसांपासून राज्यातील हवामानात चढ-उतार होत असल्याचे पाहायला मिळाले आहे. राज्यातील तापमानात घट होण्याची शक्यता असून काही भागात पावसाचा अंदाज हवामान खात्याने (IMD) वर्तवला आहे. तसंच नववर्षाच्या स्वागताला पावसाची हजेरी लागण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
Published on: 30 December 2023, 10:57 IST