Pune Weather News : नववर्षाच्या स्वागताला देशाच्या काही भागासह राज्यात पावसाची हजेरी लागण्याची शक्यता आहे. हवामान बदलामुळे पुढील ४८ तासांत पावसाचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. तसंच उत्तर भारतातील काही भागातील तापमानातही घट होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र, राजस्थानसह तामिळनाडूमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर भारतात पुढील काही दिवस आणखी दाट धुके राहण्याचा इशारा दिला आहे. येत्या काही दिवसांत पूर्व भारतातही धुक्याची चादर पसरू शकते. पुढील दोन दिवसांत मध्य आणि वायव्य भारतातील अनेक भागांमध्ये तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअसने घट होईल, असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.
उत्तर भारतात थंडीची लाट निर्माण झाल्याने त्याचा परिणाम राज्यातील हवामानावर झाला आहे. त्यामुळे राज्यातील गारठा चांगलाच वाढला होता. मात्र मागील काही दिवसांपासून आता राज्यातील तापमानात वाढ झाल्यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. तसंच पुढील ४८ तासांत वेस्टर्न डिस्टबर्न्समुळे राज्यात काही तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.
Published on: 31 December 2023, 06:02 IST