सध्या महाराष्ट्रात हलकी थंडी सुरु झाली असून वातावरणात चढ - उतार होत आहे. मात्र आता वातावरण बदलण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ तयार झाल्याने हवामानात बदल होत आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.
हवामान विभागाने पुढील पाच दिवस राज्यात अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. येत्या दोन दिवसांत उत्तर महाराष्ट्रात गारपिटीसह वादळी पावसाचा अंदाज आहे. तर मुंबई, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिकात विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे आज हवामान विभागाने राज्यातील अनेक भागात पावसाचा येलो अलर्ट जाहीर केला.
उत्तर महाराष्ट्र, छत्रपती संभाजीनगर आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत मुसळधार पावसासोबतच वादळी वारे, गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भातही विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
Published on: 24 November 2023, 05:19 IST