Weather

Unseasonal rain : राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल होत आहे. कधी उन्हाचा कडका तर कधी अवकाळी पाऊस पडत आहे. या बदलत्या वातावरणाचा शेती पिकांना मोठा फटका बसत आहे. दरम्यान, मराठवाड्यात अवकाळी पावसानं धुमाकूळ घातला आहे. त्याचबरोबर कोकणासह विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातही काही ठिकाणी अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. तर काही ठिकाणी गारपीट देखील झाली आहे.

Updated on 09 April, 2023 12:31 PM IST

Unseasonal rain : राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल होत आहे. कधी उन्हाचा कडका तर कधी अवकाळी पाऊस पडत आहे. या बदलत्या वातावरणाचा शेती पिकांना मोठा फटका बसत आहे. दरम्यान, मराठवाड्यात अवकाळी पावसानं धुमाकूळ घातला आहे. त्याचबरोबर कोकणासह विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातही काही ठिकाणी अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. तर काही ठिकाणी गारपीट देखील झाली आहे.

हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार आजही राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आज पश्चिम महाराष्ट्रासहमराठवाडा आणि विदर्भात अवकाळी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

अवकाळी पावसाचा मोठा फटका राज्यातील शेती पिकांना बसला आहे. यामध्ये फळबागांचे मोठे नुकसान झालं आहे. द्राक्ष, आंबा, केळी संत्रा, काजू या बागांना पावसाचा मोठा फटका बसला आहे. तसेच कलिंगड, गहू, कांदा, हरभरा, या पिकांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.

अवकाळी पावसामुळं सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील द्राक्ष बागांचं मोठं नुकसान झालं आहे. अवकाळी पाऊस आणि बदलत्या वातावरणामुळं द्राक्षांच्या दारत देखील घसरण झाली आहे.

तसेच बेदाना करण्यासाठी शेडवर टाकलेल्या द्राक्षावरही या अवकाळी पावसाचा परिणाम होत असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. जो बेदाना पूर्वी 200 रुपये किलोने जात होता. तो आता 50 रुपये किलोने जाण्याची शक्यता आहे. कारण द्राक्ष पिकाला हवामानाचा मोठा फटका बसला आहे.

English Summary: Unseasonal rain: Unseasonal havoc in the state! Yellow alert for rain in this area today
Published on: 09 April 2023, 12:31 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)