Weather

Unseasonal Rain : राज्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर टाकली आहे. हवामान विभागाकडून राज्यात तीन दिवस अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली असतानाच, पालघर , नाशिक आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये पावसाने हजेरी लावली आहे. नाशिक शहरासह ग्रामीण भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली.

Updated on 06 March, 2023 9:04 AM IST

Unseasonal Rain : राज्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर टाकली आहे. हवामान विभागाकडून राज्यात तीन दिवस अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली असतानाच, पालघर , नाशिक आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये पावसाने हजेरी लावली आहे. नाशिक शहरासह ग्रामीण भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली.

मध्यरात्रीपासून ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस बरसत आहे. त्यामुळे एकीकडे शेतमालाला भाव नसताना दुसरीकडे अवकाळी पावसाच्या हजेरीने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. नाशिकसह ग्रामीण भागात अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या आहेत. गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात बदल झाल्याने जिल्ह्यात काही भागात पावसाचा अंदाज व्यक्त केला जात होता.

जिल्ह्यातील येवला पट्ट्यात निफाड, लासलगावसह अन्य काही ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. त्याचबरोबर त्र्यंबकेश्वर, इगतपुरी तालुक्यातील अनेक भागात पावसाने हजेरी लावली आहे. या अवकाळी हजेरीमुळे कांदा, गहू, हरभरा, आंबा, द्राक्षं यांसह भाजीपाल्याला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

LPG Price: होळीपूर्वी आली मोठी बातमी, स्वस्तात मिळणार गॅस सिलिंडर, फक्त ही आहे किंमत!

पालघर जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस बरसला. वाडा, विक्रमगड, जव्हार आणि पालघरच्या काही भागामध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. अवकाळी पावसामुळे सर्वसामान्य शेतकरी, बागायतदार यांच्यात पुन्हा चिंतेत भार पडली आहे. आंबा त्याचप्रमाणे इतर रब्बी पिकांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे.

दरम्यान अचानक वातावरणात झालेल्या बदलामुळे अवकाळी पाऊस कोसळतो आहे. शिवाय शेती पिकावर मोठा परिणाम होत आहे. अगोदरच कांदा, पालेभाज्या, कोबी यासारख्या काही भाज्यांना बाजारात चांगला दर मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यात आज अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने सुलतानी संकटासह अस्मानी संकटामुळे शेतकरी आणखी चिंतेत आले आहेत.

खाजगी नोकरदारांना झटका, PF वर मिळणार व्याज कमी!

English Summary: Unseasonal rain accompanied by thunder and lightning in the state
Published on: 06 March 2023, 09:04 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)