Weather

Maharashtra Weather : संपूर्ण महाराष्ट्रात पुढचे तीन दिवस विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भ, कोकणात अवकाळी पावसाचा फटका बसण्याची शक्यता असून पिकांना धोका निर्माण होणार आहे.

Updated on 08 April, 2023 12:12 PM IST

Maharashtra Weather Updates : संपूर्ण महाराष्ट्रात पुढचे तीन दिवस विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भ, कोकणात अवकाळी पावसाचा फटका बसण्याची शक्यता असून पिकांना धोका निर्माण होणार आहे.

दरम्यान, काल कोकणात रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी पाऊस झाला. रत्नागिरीतील साखरपा परिसरात जोरदार पाऊस झाला आणि दाणादाण उडवून दिली. वादळाने काही घरांवरील पत्रेही उडाले. तर सिंधुदुर्गात जोरदार पाऊस बरसला. अचानक आलेल्या पावसामुळे अनेकांची तारांबळ उडाली.

विजांच्या कडकडाटासह पाऊस

संपूर्ण महाराष्ट्रात पुढचे तीन दिवस पाऊस पडेल, असा इशारा मुंबई वेधशाळेनं दिला आहे. विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल, असा अंदाज आहे. दरम्यान, विदर्भ आणि कोकणात अवकाळी पावसाचा फटका बसला.

बुलढाणा, वर्ध्यात गारपीटीसह पाऊस पडला. तर नागपूर, अमरावती, भंडा-यातही पावसानं तुफान बॅटिंग केली. या अवकाळी पावसामुळे पिकं धोक्यात आलीत, तर कोकणातील आंब्याचं नुकसान झाले आहे.

शेतकऱ्यांनो तणनाशकांचा अभ्यास

उत्तर महाराष्ट्रात पावसाने शेतीचे नुकसान

नाशिकच्या सटाणा तालुक्यातील आखतवाडे परिसरात अवकाळी पावसानं हजेरी लावली. यामुळे कांद्यासह शेतीपिकांचं मोठं नुकसान झालं. सटाण्याचे आमदार दिलीप बोरसे यांनी शेताच्या बांधावर जात नुकसानीची पाहणी केली.

नुकसानग्रस्तांना सरकारी मदत मिळवून देण्याचं आश्वासन यावेळी बोरसे यांनी दिलं. जळगाव शहरासह जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी वा-यासह अवकाळी पाऊस बरसला. यामुळे शेतक-यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. त्याचबरोबर अनेक भागांतील वीज पुरवठाही खंडित झालेला पाहायला मिळाला.

महावितरण घेणार तब्बल २९ हजार २३० कोटींचे कर्ज, मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता..

English Summary: Thunderstorm warning for next three days
Published on: 08 April 2023, 12:12 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)